कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला Redmi फोन येतोय भारतीयांच्या भेटीला; 8GB RAM सह घालणार धुमाकूळ
By सिद्धेश जाधव | Published: January 24, 2022 04:35 PM2022-01-24T16:35:56+5:302022-01-24T16:36:14+5:30
Redmi Note 11S India launch: Redmi Note 11S ची लाँच डेट सांगितली आहे तसेच टीजरमधून आगामी फोनच्या कॅमेरा सेटअपचा देखील खुलासा झाला आहे.
Redmi Note 11S स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाणार आहे. शाओमीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या फोनच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर देखील या फोनसाठी पेज लाईव्ह करण्यात आलं आहे. टीजर पोस्टरवरून रेडमी नोट 11S च्या रियर डिजाईन आणि कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे.
Redmi Note 11S India launch
रेडमी नोट 11एस स्मार्टफोन भारतात 9 फेब्रुवारीला लाँच होईल. फोन फ्लॅट फ्रेमसह बाजारात येईल. तसेच या फोनच्या ब्लू कलर व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल मिळेल. ज्यात क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात येईल. सोबत एलईडी फ्लॅश देखील मिळेल.
Redmi Note 11S चे संभाव्य स्पेक्स
लीक रिपोर्ट्सनुसार, रेडमी नोट 11एस मध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. सोबत फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु डिजाइन रेंडरनुसार, यात पंच-होल कटआउट मिळेल.
फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असू शकतो. फोनमध्ये MediaTek Helio G96 चिपसेट मिळेल. हा स्मार्टफोन Android 11 वर चालेल. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.
हे देखील वाचा:
- DSLR सारख्या कॅमेरा सिस्टमसह Oppo Reno 7 सीरिज करणार एंट्री; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस
- WhatsApp ग्रुप अॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास