नवी दिल्ली : रिलायन्सजिओ होम ब्रॉडबँड सर्व्हिस गिगाफायबर (Gigafiber) गुरुवारी लाँच करण्यात आली. जिओच्या या गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे 699 रुपयांपासून 8,499रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 Mbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तर 8,499रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1Gbps पर्यंत इंटरनेटचा स्पीड मिळणार आहे.
गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे 3,999 रुपये आहे. यापुढील डायमंड प्लॅन आहे, त्याचे मासिक मासिक भाडे 2499 रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे मासिक भाडे 3999 रुपये आहे. तर सर्वाधिक महागडा प्लॅन टायटॅनिअम असून याचे मासिक भाडे 8999 रुपये आहे. या सर्व गोल्ड ते टायटॅनिअम प्लॅनमध्ये ग्राहकाला 4K टीव्ही मोफत मिळणार आहे.
699 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार?रिलायन्स जिओचा सुरुवातीचा प्लॅन Bronze आहे. यामध्ये ग्राहकाला 100 mbps पर्यंत इंटरनेट मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा (100GB+50GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यामध्ये फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना फायदा होणार आहे. म्हणजेच, ग्राहक भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात.
849 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय असणार?849 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 mbps इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (200GB+200GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहकांना भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करता येणार आहे. शकतात.
1,299 रुपयांच्या प्लॅमध्ये मिळणार मोफत टीव्हीजिओच्या 1,299 रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना 250 mbps स्पीडचे इंटरनेट मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (500GB+250GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय, मोफत व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 4K स्मार्ट टीव्ही मिळणार आहे.
2,499 रुपयांचा मासिक प्लॅनरिलायन्स जिओच्या 2,499 रुपयांच्या डायमंड प्लॅनमध्ये ग्राहकांना 500 mbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट डेटा (1250 GB+250GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 24 इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे.
3,999 रुपयांचा प्लॅनमध्ये 1Gbps चे इंटरनेट स्पीडरिलायन्स जियोच्या 3,999 रुपयांचया प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 1Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना अनलिमिडेट डेटा (2500 GB) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 32 इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे.
8,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 43 इंचाचा टीव्हीरिलायन्स जियोच्या 8,499 रुपयांचया प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 1Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये 43 इंचाचा 4K टीव्ही मिळणार आहे. यात टीव्हीची किंमत MRP 44,990 रुपये आहे. तसेच, यामध्ये ग्राहकांना एक महिन्यासाठी 5000 GB डेटा मिळणार आहे.