अलादीनच्या कथांमधील जादुई चटई तुम्हाला आठवत असेल. तशीच चटई वेगवेगळ्या सिनेमांमध्येही तुम्ही पाहिली असेल. पण आता प्रत्यक्षात एक जादुई चटई तयार करण्यात आली आहे. अमेरिकेतील संशोधकांनी ही चटई तयार केली आहे. एका खासप्रकारच्या तरल पदार्थांच्या संपर्कात येऊन ही चटई आपोआप मागे-पुढे सरकू शकते. एका रासायनिक प्रक्रियेद्वारे द्रव्य गतिशील होतं, त्यामुळे चटई सुद्धा चालू लागते.
यूनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गमधील संशोधक एना सी ब्लेज्स यांच्यानुसार, रसायनाच्या मदतीने एक निर्जीव वस्तूला चालण्या-फिरण्याच्या स्थितीत आणणे एक मोठं आव्हान आहे. शोधानुसार, संशोधकांनी ही चटई तयार करण्यासाठी गोल आणि चौकोनी आकाराच्या पार्टिकलचा वापर केला, जे द्रव्य भरलेल्या मायक्रो चेंबरच्या आता स्वत: हालचाल करु शकतात.
संशोधकांनी सांगितले की, त्यांनी अशी एक सिस्टीम तयार केली आहे जी केमिकल रिअॅक्शनच्या मदतीने तरल पदार्थांना गती देऊ शकते. याच्या मदतीने चटई स्वत:हून हालचाल करु शकेल, वळू शकेल आणि आकारही बदलू शकेल. या चटईमधील केमिकल्स कॅटालिस्टसारखं काम करतं. असं पहिल्यांदाच झालं आहे की, एखादी २डी शीट(चटई) कॅटालिटीक केमिकल रिअॅक्शनच्या मदतीने चालण्यासोबतच ३डी रुपात रुपांतरितही होते.
चटईमध्ये वेगवेगळ्या जागांवर कॅटालिस्ट लावण्यात आले आहेत, जे तरल पदार्थांना नियंत्रित करण्याचं काम करतात. संशोधकांच्या टीममधील ओलेग यांचं म्हणणं आहे की, एखादी वस्तू उचलण्यासाठी, हलक्या वस्तू पकडण्यासाठी आणि जमिन स्वच्छ करण्यासाठी ही चटई कामात येऊ शकते.
शोधानुसार, हे डिवाईस चालण्या-फिरण्यासाठी केमिकल एनर्जीचा वापर करतं. त्यामुळे याच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची कामे केली जाऊ शकतात. त्यासोबतच या डिवाइस फुलांचा आकार दिला गेला तर ते आपोआप उमलतात आणि कळीचं रुप धारण करतात.