सॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून २० जानेवारीपासून खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य ३२,९९० रूपये असून ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप असून हे याचे विशेष फिचर आहे. याच्या पुढील बाजूस एफ/१.९ अपार्चर आणि लाईव्ह फोकस या फिचरने सज्ज असणारे १६ व ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी घेता येणार आहे. तर एफ/१.७ अपार्चरसह यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा असेल. युएसबी टाईप-सी चार्जींग प्रणालीसह यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याने कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येईल. यात कॉन्टॅक्टलेस मोबाईल पेमेंटसाठी यात सॅमसंग पे ही प्रणाली देण्यात आलेली आहे. याला सॅमसंग गिअर व्हिआर हेडसेटचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२२२० बाय १०८० पिक्सल्स) सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याची ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असून मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.