नवी दिल्ली - काही वर्षांपूर्वी सॅमसंगने नोकियाची मक्तेदारी मोडीत काढली होती. यानंतर काही वर्षे सॅमसंगच राज्य करत आहे. मात्र आता दक्षिण कोरियाची आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी असेलल्या सॅमसंगने आपल्या युजर्सची माफी मागितली आहे. कंपनीकडून रात्री ब्रिटनमधील युजर्सच्या मोबाईलवर एक अजब नोटिफिकेशन पाठवलं गेलं. यामुळे सॅमसंगने आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.
नोटिफिकेशनमध्ये दोन वेळेस केवळ ‘1’ लिहिला होता. हे नोटिफिकेशन सॅमसंगच्या Find My Mobile सर्व्हिसद्वारे पाठवण्यात आले होते. सॅमसंगच्या जवळपास 20 टक्के युजर्सना ते नोटिफिकेशन मिळाले. नोटिफिकेशनचा परिणाम फोनच्या बॅटरीवर झाल्यामुळे ग्राहकांनी अधिक नाराजी दर्शवली होती. Galaxy S7, Galaxy A50 पासून Galaxy Note 10 यांसारख्या डिव्हाईसवर नोटिफिकेशन पाठवले गेले होते. त्यानंतर अनेक युजर्सनी नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. युजर्सनी कंपनीकडे याबाबत विचारणा केली असता सॅमसंगने ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
सॅमसंगने अजब नोटिफिकेशन पाठवल्यावर युजर्सची माफी मागितली आहे तसेच ते चुकून पाठवलं गेलं असं देखील म्हटलं आहे. 'अंतर्गत चाचणीदरम्यान ते नोटिफिकेशन चुकून पाठवलं गेलं होतं. त्याचा तुमच्या मोबाईलवर किंवा अन्य डिव्हाईसवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना झालेल्या त्रासाबाबत आम्ही दिलगीर आहोत, भविष्यात असे घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ' अशा आशयाचं ट्विट सॅमसंगने करून युजर्सची माफी मागितली आहे.
'या' बातम्या ही नक्की वाचा
TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर
'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'
देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत
आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल
आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
'जलयुक्त शिवार हे नाव गोंडस, पण कामे सुमार झाली'; जयंत पाटलांनी भूमिका मांडली
राज्यपालांनी नाकारला सरपंच निवडीचा अध्यादेश; जयंत पाटील म्हणाले, 'जसा आपला आदेश!'
ओवेसींच्या मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक
शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला
China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग