शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

सेलकॉन युनीक स्मार्टफोनची लिस्टींग

By शेखर पाटील | Published: February 20, 2018 11:49 AM

सेलकॉन मोबाईल्स या कंपनीने सेलकॉन युनीक या मॉडेलला बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून कंपनीच्या संकेतस्थळावर याची लिस्टींग करण्यात आली आहे.

सेलकॉन मोबाईल्स या कंपनीने सेलकॉन युनीक या मॉडेलला बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून कंपनीच्या संकेतस्थळावर याची लिस्टींग करण्यात आली आहे.

सेलकॉन युनीक (Celkon UniQ) हा स्मार्टफोन ग्राहकांना ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आल्याचे कंपनीच्या संकेतस्थळावरील लिस्टींगवरून दर्शविण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये या मॉडेलला गोल्ड आणि ग्रे रंगाच्या पर्यायांमध्ये प्रत्यक्षात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी रेझोल्युशन (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असेल. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.

सेलकॉन युनीक या स्मार्टफोनमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे देण्यात आले आहेत. यात एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे. तर यातील ८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्‍यामध्ये मूनलाईट फ्लॅशची सुुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने कजी उजेड असतांनाही अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याच्या पुढील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले असून याची संरचना अ‍ॅपल आयफोनच्या टच आयडीप्रमाणे करण्यात आली आहे. यात २७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. लवकरच हे मॉडेल ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.