अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासावर सायबर हल्ला झाला आहे. यूएस ऑफिस ऑफ द इंस्पेक्टर जनरलच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरी (JPL) मध्ये माहितीची चोरी करण्यात आली आहे. या चोरीमध्ये 500 एमबी डाटा चोरीला हेला आहे. या हल्ल्यात 23 फाईल्समधून माहिती चोरण्यात आली असून हॅकरबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नासावर सायबर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी सायबर हल्ला झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोपनिय माहितीची चोरी करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे नासावर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये Raspberry Pi कम्प्युटिंग सिस्टमचा वापर करण्यात आलाआहे. या कॉम्प्युटरची किंमत 25 ते 35 डॉलर आहे. या कॉम्प्युटरचा आकार एका क्रेडिट कार्डएवढाच असतो.
कोणती माहिती चोरीला गेली?नासाच्या अनेक महत्वाच्या योजनांसंबंधी माहिती चोरी झाली आहे. ही अतिमहत्वाची माहिती हॅकर्सच्या ताब्यात गेली असून क्युरिऑसिटी रोव्हर, मंगळ ग्रहावर चालणाऱ्या कारबाबतची माहितीही चोरीला गेली आहे. हॅकर्सनी जेपीएलची प्रणाली भेदताना डीप स्पेस नेटवर्कमध्येही प्रवेश केला आहे. ही अंतराळात संपर्क साधण्यासाठीच्या अँटेनाची प्रणाली आहे.