नवी दिल्ली - सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकने आणखी एक नवं फीचर आणलं आहे. या भन्नाट फीचरच्या माध्यमातून Send केलेले मेसेज Unsend म्हणजेच पाठवलेले मेसेज पुन्हा परत घेता येणार आहेत. Gmail मध्ये ज्याप्रमाणे पाठवलेले मेल अनसेंड करण्याचा पर्याय असतो. त्याचप्रमाणे आता फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पाठवलेले मेसेज अनसेंड करता येणार आहेत.
फेसबुकचे युजर्स पाठवलेला मेसेज अनसेंड अथवा डिलीट करू शकतात. मात्र सध्या युजर्स फक्त त्यांच्या बाजूने मेसेज डिलीट करु शकतात. या नवीन फीचरच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या मित्रांच्या इनबॉक्समध्ये जाऊन देखील पाठवलेला मेसेज डिलीट करू शकतात. पण युजर्सना हे केवळ 10 सेकंदाच्या आत करायचे आहे. अमेरिकन वेबसाईट The Verge ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे फीचर केवळ iOS प्रणालीसाठी मेसेंजरच्या लेटेस्ट अपडेटसोबत जोडण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅप युजर्स ही करू शकतात मेसेज डिलीट
फेसबुकप्रमाणेच संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपकडे ही हे भन्नाट फीचर उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपचे युजर्स देखील पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतात. मात्र यासाठी युजर्सना 30 मिनिटाचा वेळ दिला जातो. व्हॉट्सअॅपवर कोणताही मेसेज, फोटो व्हिडीओ आणि ऑडीओ पाठवल्यानंतर डिलीट करता येतं.