छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:49 PM2021-03-19T14:49:06+5:302021-03-19T14:52:35+5:30
Instagram News : विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अॅप असणार आहे.
नवी दिल्ली : फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) लहान मुलांसाठी नवीन अॅप लाँच करणार आहेत. हे अॅप सध्याच्या इन्स्टाग्रामची एक नवीन व्हर्जन असेल. विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अॅप असणार आहे. इन्स्टाग्राम प्रॉडक्टचे उपाध्यक्ष विशाल शाह यांनी BuzzFeed ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामचे दोन व्हर्जन असतील. एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी असेल. तर दुसरं व्हर्जन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असेल. लहान मुलं या सेफ मोडमध्ये इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार आहेत.
सध्याचे इन्स्टाग्रामची पॉलिसी 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना इन्स्टाग्राम वापरण्याची परवानगी देत नाही. तसेच, मुलं त्यांचे पालक आणि व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली इन्स्टाग्राम वापरू शकतात. BuzzFeed च्या रिपोर्टनुसार, किड्स फोक्स्ड Instagram व्हर्जनचे काम Instagram चे प्रमुख Adam Mosseri पाहतील. त्याचे नेतृत्व फेसबुकचे उपाध्यक्ष Pavni Diwanji करणार आहेत, त्यांनीच यापूर्वी युट्यूब किड्सचे नेतृत्व केले होते. हे Google च्या सब्सिडियरीचे चाइल्ड फोकस्ड प्रोडक्ट आहे.
Instagram कडून महिलांसाठी खास सोशल मीडिया सेफ्टी टिप्स, असं ठेवा अकाऊंट सेफ
फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांवर वाढत्या गुन्ह्यांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. या प्लॅटफॉर्मवर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट असल्याचा आरोप आहे. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट काढून टाकण्यासाठी दबाव वाढला होता. यूके आधारित नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टी टू चिल्ड्रनच्या (National Society for the Prevention of Cruelty to Children) रिपोर्टनुसार, इन्स्टाग्रामवर मुलांशी संबंधित सर्वाधिक केसेस आढळले आहेत. गेल्या तीन वर्षात यात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी स्वतंत्र अॅप्स तयार करण्याचा दबाव वाढला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
इंटरनेटचा स्पीड कमी झालाय? मग फोनमध्ये करा "हे" बदलhttps://t.co/8clc5ctJZg#smartphones#Internet#technology
— Lokmat (@MiLOKMAT) March 14, 2021
WhatsApp कॉल रेकॉर्ड करायचाय? Android आणि iPhone मध्ये यासाठी नेमकं काय करायचं, जाणून घ्या
स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा महत्त्वाचे कॉल हे फोनमध्ये रेकॉर्ड केले जातात. फोनमध्ये ती सुविधा देण्यात आलेली असते. हल्ली व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम झालं आहे. फक्त मेसेजिंग नाही तर व्हिडीओ कॉलिंग आणि व्हाईस कॉलिंगसाठी देखील हमखास व्हॉट्सअॅपचा वापर हा केला जातो. मात्र व्हॉट्सअॅपमध्ये युजर्ना कॉल रेकॉर्ड करता येत नाही. तशी सुविधाच नाही. पण आता काळजी करू नका, युजर्ससाठी एक खूशखबर आहे. व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्याच्या काही पद्धती आहेत. अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्हींमध्ये व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
भारीच! आता मोबाईलवर सरकारी योजना आणि होणाऱ्या लाभाची मिळणार झटपट माहितीhttps://t.co/5TuiVI2eaX#RationCard#OneNationOneRationCard#MeraRation#App#technology
— Lokmat (@MiLOKMAT) March 15, 2021
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....
Sonu Sood : सोनू सूद पुन्हा बनला मसिहा! एक लाख लोकांना नोकरी देणार, 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलवणार https://t.co/vkbwUoNc4a#SonuSood#JOB#GoodWorkerApp#India
— Lokmat (@MiLOKMAT) March 17, 2021