मंगळ ग्रहावर फक्त अमेरिका आणि चीन सारख्या देशांची नजर नाही तर खाजगी कंपन्या देखील मंगळवार जाण्याची तयारी करत आहेत. परंतु अंतराळ प्रवासाच्या अडचणींसह या प्रवासाला लागणारा वेळ ही एक मोठी समस्या आहे. मंगळावरील मोहीम दर 26 महिन्यांतून फक्त एकदा लाँच करता येते. कारण या काळात मंगळ आणि पृथ्वी मधील अंतर सर्वात कमी असतं. कमी अंतर असूनही सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं पृथ्वीवरून मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी 9 महिने लागतात. हा कालावधी कमी करण्यासाठी अनेकजण संशोधन करत आहेत.
यावर एक उपाय कॅनडामधील मॅक गिल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शोधला आहे. जर त्यांनी सांगितलेल्या प्रपल्शन सिस्टमचा वापर अवकाश यानानं केला तर फक्त 45 दिवसांमध्ये पृथ्वी-मंगळ मधील प्रवास करता येईल. असे झाल्यास मंगळ ग्रहावर सुरु असलेल्या संशोधनाचा वेग वाढेल. हे वैज्ञानिक एका लेजर-थर्मल प्रपल्शन सिस्टमचा अभ्यास करत आहेत. जिच्या मदतीनं एवढ्या कमी वेळात मंगळ गाठता येईल.
हे संशोधन अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकशित करण्यात आलं आहे. यात संशोधनाचं नेतृत्व एयरोस्पेस इंजीनियरिंगचे विद्यार्थी इमॅन्युएल डुप्ले यांनी केलं आहे. अवकाश यानाला खोल अवकाशात नेण्यासाठी लेजर बीमचा वापर केला जातो. जेवढी जास्त शक्तिशाली लेजर असेल तेवढा वेग मिळतो. संशोधकांनी यानावर मोठ्या लेजर्स लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
हे देखील वाचा: