10 दिवसांच्या बॅटरी लाइफसह TicWatch GTH स्मार्चवॉच भारतात लाँच; स्किन टेम्परेचरसह मिळणार हार्ट रेट मॉनिटर
By सिद्धेश जाधव | Published: July 19, 2021 07:47 PM2021-07-19T19:47:17+5:302021-07-19T19:49:07+5:30
TicWatch मध्ये 1.55 इंचाचा टचस्क्रीन TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, हा वॉच 10 दिवस चालू शकतो.
Mobvoi कंपनीने भारतात बजेट स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये TicWatch GTH स्मार्टवॉच लाँच केला आहे. या स्मार्टवॉच RTOS वर चालतो. यात स्किन टेम्परेचर, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि SpO2 मॉनिटरिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. TicWatch GTH स्मार्टवॉच 10 दिवसांची बॅटरी लाइफ देऊ शकतो.
TicWatch GTH चे स्पेसिफिकेशन्स
TicWatch बजेट स्मार्टवॉच आहे, जो RTOS वर चालतो. यात 1.55 इंचाचा टचस्क्रीन TFT डिस्प्ले 360x320 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ 5.1 देण्यात आली आहे. यातील 260mAh ची बॅटरी 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. या स्मार्टवॉचमध्ये 5ATM वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे.
TicWatch GTH मध्ये आउटडोर रन, इंडोर रन, आउटडोर सायकलिंग, इंडोर सायकलिंग, रोप स्किपिंग, स्विमिंग, वॉकिंग, रोइंग, फ्रीस्टाइल, जिमनास्टिक्स, सॉकर, बास्केटबॉल, योगा आणि माउंटेन क्लायम्बिंग इत्यादी 14 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. वॉच 24 तास हार्ट रेट, SpO2 (ब्लड ऑक्सीजन) आणि स्किन टेम्परेचर मॉनिटर करतो.
TicWatch GTH ची किंमत
TicWatch GTH स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 8,599 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. परंतु, हा Amazonच्या माध्यमातून 4,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टवॉच ब्लॅक रेवेन रंगात सादर करण्यात आला आहे.