Trojan Malware : अलर्ट! अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या बँक ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा; नाहीतर खातं होईल रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 06:50 PM2021-09-22T18:50:34+5:302021-09-22T19:04:03+5:30

Trojan Malware : ट्रोजन मालवेअर अँड्रॉईड फोनचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांवर गुपचूप सायबर हल्ला करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.

trojan posing as it refund skulking to attack android phone bank customers | Trojan Malware : अलर्ट! अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या बँक ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा; नाहीतर खातं होईल रिकामं

Trojan Malware : अलर्ट! अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या बँक ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा; नाहीतर खातं होईल रिकामं

googlenewsNext

नवी दिल्ली - तुम्ही देखील जर अँड्रॉईड फोनद्वारे बँकिंग (Mobile Banking Service) सेवांचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशाच्या फेडरल सायबर सिक्युरिटी एजन्सीने एका अ‍ॅडव्हायझरीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सायबर स्पेसमध्ये बँकिंग ट्रोजन मालवेअर (Trojan Malware) सापडला आहे. ट्रोजन मालवेअर अँड्रॉईड फोनचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांवर गुपचूप सायबर हल्ला करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. या मालवेअरने आधीच 27 पेक्षा जास्त सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांना लक्ष्य केलं आहे.

भारतीय कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (Indian Computer Emergency Response Team/CERT-In) कडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे की, फिशिंग मालवेअर 'इन्कम टॅक्स रिफंड'च्या स्वरुपात दिसत आहे. यामुळे ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता प्रभावीपणे धोक्यात येऊ शकते. परिणामी मोठ्या प्रमाणावर हल्ले आणि आर्थिक फसवणुकीची देखील शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे.

अ‍ॅडव्हायजरीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बँकिंग ग्राहकांना ड्रिनिक अँड्रॉईड मालवेअर (Drinik Android Malware) वापरून नवीन प्रकारच्या मोबाईल बँकिंग कँपेनद्वारे लक्ष्य केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. ड्रिनिकने 2016 मध्ये SMS चोरी करण्याच्या स्वरुपात सुरुवात केली होती आणि अलीकडेच याचे बँकिंग ट्रोजन विकसित झाले आहे. यामुळे फिशिंगचा धोका वाढला आहे. युजर्सची गोपनीय बँकिंग माहिती प्रविष्ट करण्यास हा मालवेअर भाग पाडतो. 

27 पेक्षा जास्त बँकांच्या ग्राहकांना केलंय लक्ष्य

सीईआरटी-इनने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील 27 पेक्षा जास्त भारतीय बँकांच्या ग्राहकांना आधीच या सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केलं आहे असं म्हटलं आहे. तसेच सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी आणि फिशिंग, हॅकिंग आणि ऑनलाईन हल्ल्यांपासून सायबर स्पेसचे संरक्षण करण्यासाठी सीईआरटी-इन ही फेडरल तंत्रज्ञान शाखा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: trojan posing as it refund skulking to attack android phone bank customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.