ट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स

By शेखर पाटील | Published: July 26, 2017 10:17 PM2017-07-26T22:17:49+5:302017-07-26T22:18:14+5:30

ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधीकरणाने देशभरातील स्मार्टफोन युजर्ससाठी तीन अ‍ॅप्स उपलब्ध केले असून याच्या माध्यमातून विविधांगी सुविधा मिळणार आहेत.

try apps developed by trai | ट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स

ट्राय करा...ट्रायचे उपयुक्त अ‍ॅप्स

Next

ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधीकरणाने देशभरातील स्मार्टफोन युजर्ससाठी तीन अ‍ॅप्स उपलब्ध केले असून याच्या माध्यमातून विविधांगी सुविधा मिळणार आहेत.

ट्राय ही दूरसंचार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. अर्थात मोबाईलधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासह त्यांना सेल्युलर कंपन्यांकडून उत्तम दर्जाची सेवा मिळते की नाही ? यावर ट्राय सातत्याने लक्ष ठेवून असते. यासाठी या संस्थेने तीन अ‍ॅप्स सादर केले आहेत. प्रत्येक स्मार्टफोनधारकासाठी हे अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. हे अ‍ॅप्स खालीलप्रमाणे आहेत.

माय स्पीड अ‍ॅप

नावातच नमूद असल्यानुसार हे अ‍ॅप इंटरनेटच्या गतीच्या मापन करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. बहुतांश कंपन्या अवास्तव पध्दतीने आपापल्या इंटरनेट सेवेच्या गतीमानतेबद्दल दावे करत असतात.  या दाव्यांमधील सत्यासत्यता या अ‍ॅपच्या माध्यमातून कुणाही युजरला कळू शकते. अर्थात युजर वापरत असलेल्या इंटरनेट सेवेची गतीसह सर्व्हीस प्रोव्हायडर आणि नेटवर्क कव्हरेजबाबतही माहिती याद्वारे मिळत असून ती ट्रायकडे पाठविण्याची व्यवस्था यात आहे. मात्र एखाद्या कंपनीच्या सेवेबाबत ग्राहक संतुष्ट नसल्यास तक्रार करण्याची सुविधा यात देण्यात आलेली नसून यासाठी संबंधीत कंपनीकडेच तक्रारीचे सुचविण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली माहिती ही नकाशावर क्राऊडसोर्सींगच्या स्वरूपात दर्शविण्यात येते हे विशेष.

गुगल प्ले स्टोअरवरून माय स्पीड अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर कुणीही आपल्या इंटरनेट सेवेची (मोबाईल डाटा अथवा वाय-फाय) गती जाणून घेऊ शकतो. यात डाऊनलोडसह अपलोडींगच्या गतीचाही समावेश आहे. यानंतर अत्यंत सुलभ पध्दतीने ही माहिती ट्रायकडे पाठविण्याची सुविधा आहे.

डाऊनलोड लिंक: माय स्पीड अ‍ॅप

https://play.google.com/store/apps/details?id=com.rma.myspeed

 

माय कॉल अ‍ॅप

माय कॉल अ‍ॅपमध्ये युजरला कोणत्याही सेल्युलर सेवेच्या कॉलच्या प्रतिला मानांकन देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात या कॉलचा दर्जा नेमका कसा होता? याचे १ ते ५ यामध्ये रँकींग देता येणार आहे. याशिवाय त्या ग्राहकाचा कॉल ड्रॉप झाला वा खराब नेटवर्क होते का? याची माहितीदेखील देता येणार आहे. तर याच्या खालील बाजूस संबंधीत युजर हा नेमका बंदीस्त (इनडोअर) जागेतून कॉल करत होता की खुल्या (आऊटडोअर)? तसेच तो प्रवासातून कॉल करत होता का? याची माहिती विचारण्यात आलेली आहे. याशिवाय त्या युजरला अन्य कोणती अडचण आल्यास याची माहिती देण्याची सुविधा आहे. यानंतर खालील बटनावर क्लिक करून कुणीही आपली तक्रार पाठू शकतो. प्रत्येक कॉलनंतर ही पॉप-अप विंडो उघडल्यास युजरला त्रास होऊ शकतो. यामुळे सेटींगच्या माध्यमातून याची निवड करता येते. तर अ‍ॅपच्या पेजवर गेल्यास एकाच ठिकाणी सर्व कॉलची यादी दिसून त्याला रँकींग देता येते. 

डाऊनलोड लिंक: माय कॉल अ‍ॅप

https://play.google.com/store/apps/details?id=com.trai.mycall&hl=en-gb

 

डीएनडी २.० अ‍ॅप

नावातच नमूद असल्यानुसार हे ‘डू नॉट डिस्टर्ब’ या सेवेसाठीचे अ‍ॅप आहे. या सुधारित आवृत्तीत नकोसे असणारे कॉल वा एसएमएसपासून मुक्ती मिळण्याची सुविधा आहेच. याशिवाय यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने एसएसएम साठी इंटिलेजियंट स्पॅम डिटेक्शन इंजिन ही प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने स्पॅम एसएमएसला अटकाव करण्यात येऊन याची माहिती ट्रायकडे देण्यात येते. म्हणजेच ट्रायला याच्या मदतीने नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटींग कंपन्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. याचा युजर इंटरफेस अतिशय सुलभ आहे.

डाऊनलोड लिंक: डीएनडी २.० अ‍ॅप

https://play.google.com/store/apps/details?id=trai.gov.in.dnd&hl=en-gb

 

 

Web Title: try apps developed by trai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.