ट्विटर इलॉन मस्क यांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठे बदल करण्यात आले आहेत. इलॉन मस्क यांनी ब्लू टिकसाठी सबक्रिप्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता या निर्णयानंतर टिक मध्ये मोठे बदल केले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या ट्विट अकाउंटवरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे.
या अकाउंटवरील ब्लू टिक हटवून आता ग्रे कलरची टिक दिसत आहे. खाते हँडलच्या खाली भारत सरकारचा टॅगही दिसत आहे. नव्या नियमानुसार हा बदल करण्यात आला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्या खात्यातूनही ब्लू टिक काढण्यात आली आहे. आता त्यांच्या नावापुढे ग्रे कलरची टिक दिसत आहे. ग्रे टिक फक्त सरकारशी संबंधित लोकांनाच देण्यात येणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. पण, सध्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ग्रे टिक दिलेली नाही. भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर ग्रे टिक असेल की नाही हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. ट्विटरने गेल्या आठवड्यात नियम बदलली आहेत. त्यामुळे व्यावसायिक अकाउंटला गोल्डन टिक दिसत आहे.
ब्लू टिक सबस्क्रिप्शन घेतल्यावर ग्रे आणि सामान्य वापरकर्त्यांना सरकारचे खाते दिले जाईल. कंपनी हळूहळू हे फीचर आणत आहे. म्हणजेच येत्या काही दिवसात इतर खात्यांमध्ये ग्रे टिक्स दिसणार आहे.
भारताचा नेपोलियन! 'जनरल झोरावर' २०० वर्षांनी पुन्हा जिवंत होणार; चीनच्या सीमेवर तैनात होणार
गेल्या काही दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटर वर एख पोल घेतला होता. या त्यांनी मी ट्विटर प्रमुख पद सोडायचे का असा प्रश्न केला होता, यात अनेकांनी या मतदानात 17 मिलियनहून अधिक लोकांनी भाग घेतला होता.