नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरने (Twitter) आता आणखी एक नवीन आणि जबरदस्त फीचर आणलं आहे. यामुळे युजर्सचा फायदा होणार आहे. यापूर्वी ट्विटरने आपल्या सर्व युजर्ससाठी Twitter Spaces फीचर्स आणलं होतं. त्यानंतर आता आणखी एक फीचर आणलं असून Tip Jar असं त्याचं नाव आहे. Twitter Tip Jar हे अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीवर सहज वापरता येणार आहे. मात्र सध्या हे फीचर फक्त काही निवडक लोकांसाठीच आहे. या फीचरचा लाभ निवडक पत्रकार, तज्ञ आणि निर्माते घेऊ शकणार आहेत. नंतर लवकरच ही सेवा सामान्य युजर्ससाठी देखील सुरू करण्यात येणार आहे.
ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर ट्विटरवर पैसे पाठविण्याचा आणि प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आहे. या फीचरवर क्लिक करून युजर्सना Bandcamp, Cash App, Patreon, PayPal आणि Venmo सारख्या ट्रान्झॅक्शन Apps दिसतील ज्याद्वारे युजर्सर टिप करू शकतील. पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीत ते युजर्सकडून पैसे घेणार नाहीत. ट्विटरने युजर्स अनेकदा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फॉलो, रिट्वीट करतात, लाईक्स करतात असं म्हटलं आहे. त्यानंतर आता टीप-जारद्वारे पैसे देऊ शकणार आहेत. हे फीचर आता सध्या इंग्रजीमध्ये असून लवकरच ते इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध होईल.
ट्विटरचं हे जबरदस्त फीचर वापरण्यासाठी युजर्सना प्रोफाईल एडिट पर्यायावर जावं लागेल . यानंतर, टीप-जार फीचर खाली दिसेल ते सुरू करावे लागेल. यानंतर पैशसंबंधी माहिती द्यावी लागेल आणि Twitter Tip Jar फीचरचा फायदा करून घेता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. कोरोना व्हायरसच्या भीतीने गेल्या वर्षभरापासून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असून आता अनेकांसाठी वर्क फ्रॉम होम नॉर्मल झाले आहे. वर्क फ्रॉम होम मुळे कंपन्यांना आता मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
Google ने कर्मचाऱ्यांच्या Work From Home मधूनही 'कमावला' बक्कळ पैसा; तब्बल 7400 कोटींचा फायदा
जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, वर्क फ्रॉम होम गुगलसाठी अत्यंत फायद्याचं ठरलं आहे. गुगलने वर्क फ्रॉम होममुळे तब्बल 1 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 7400 कोटी रुपये वाचवले आहेत. गुगलचे कर्मचारी गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने प्रमोशन आणि इंटरनटेमेंटचा खर्च कमी केला. त्यातून कंपनीला 268 मिलियन डॉलर म्हणजेच 1980 कोटी रुपये वाचवता आले आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....