लेनोव्हो ए२७५ आणि ए४७५ हे दोन्ही लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे आहेत. यातील बरेचसे फिचर्स हे समान आहेत. दोन्ही लॅपटॉप उत्तम दर्जाच्या बॅटरीने सज्ज असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. दोन्ही मॉडेलमध्ये एएमडी प्रो ए १२ हा प्रोसेसर देण्यात आला असून याला रेडिऑन आर७-क्लास या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे. दोन्ही लॅपटॉप १६ जीबी रॅमने सज्ज असून स्टोअरेजसाठी ५१२ जीबी आणि एक टेराबाईटचे पर्याय देण्यात आले आहेत.
लेनोव्हो ए२७५ लॅपटॉप मध्ये १२.५ इंची तर लेनोव्हो ए४७५ मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले असतील. यात टचस्क्रीन डिस्प्लेचा पर्यायदेखील देण्यात येणार आहे. हे दोन्ही लॅपटॉप एलटीई नेटवर्कला सपोर्ट करणारे आहेत. अर्थात यात फोर-जी नेटवर्कला वापरता येईल. तसेच यात ब्ल्यु-टुथ व वाय-फायचा सपोर्टदेखील असेल. यामध्ये दोन युएसबी ३.०, युएसबी टाईप-ए पोर्ट, एचडीएमआय, युएसबी टाईप-सी कनेक्टर, हेडफोन पोर्ट आदी कनेक्टीव्हटी देण्यात आली आहे.
लेनोव्हो थिंकपॅड ए २७५ हे मॉडेल ८६९ डॉलर्सला तर लेनोव्हो थिंकपॅड ए ४७५ हा लॅपटॉप ८४९ डॉलर्स मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. हे दोन्ही लॅपटॉप ग्राहकांना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात खरेदी करता येणार आहेत. तर भारतात याची अधिकृत लाँचीग लवकरच होऊ शकते