राष्ट्रीय सुरक्षेला धोका?, अमेरिकेच्या लष्कराने TikTok अॅपवर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:35 PM2020-01-01T16:35:33+5:302020-01-01T16:41:56+5:30
'Tik Tok एक सायबर धमकी सारखेच आहे.'
लोकप्रिय व्हिडीओ अॅप Tik Tokवर अमेरिकेच्या लष्कराने बंदी घातली आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील लष्कराचे जवान Tik Tok हे अॅप वापरू शकणार नाहीत. Tik Tok अॅप हे चीनमधील Bytedance या कंपनीने तयार केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराचे म्हणणे आहे की, चीनच्या या व्हिडीओ अॅपमुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचू शकतो.
येथील मिलिट्री डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, लष्कराचे प्रवक्ते Lt. Col. Robin Ochoa यांनी सांगितले की, Tik Tok एक सायबर धमकी सारखेच आहे. Bytedance चे Tik Tok अॅप अमेरिकेतील हेरगिरी करण्यासाठी वापरले जाऊ शकते, असे लष्कराचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या नौदलाने आपल्या मेंबर्संना Tik Tok अॅपला सरकारद्वारे दिलेल्या डिव्हाईसने डिलीट करायला सांगितले आहे. तसेच, रिपोर्टनुसार, कोणतेही अॅप डॉऊनलोड करण्याआधी सावधानता बाळगण्याचा सल्ला, संरक्षण विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेत Tik Tok अॅपची चौकशी करण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये काही नेत्यांनी Tik Tok अॅपच्या सेक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर Tik Tok अॅपची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चीनचे हे अॅप अमेरिकेतील युजर्संचा डेटा गोळा करत आहे की नाही, याबाबतची मुख्य चौकशी करण्यात येत आहे.
(Tik Tok नेमके आहे तरी काय? जाणून घ्या फायदे तोटे...)