Vivo बाबत काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि लवकरच कंपनी भारतात Vivo V21 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे. भारतीय चाहते या स्मार्टफोनची वाट बघत असताना आता अशी बातमी आली आहे कि, कंपनी Vivo V23 सीरीजवर देखील काम करत आहे. कारण या सीरीजमधील Vivo V23e हा स्मार्टफोन V2116 या मॉडेल नंबरसह IMEI डेटाबेस वेबसाइटवर दिसला आहे. लिस्टिंगवरून फोनचे नाव समजले नाही,परंतु यावरून विवो वी23 सीरीजवर कंपनी काम करता असल्याचे समजते.
टिप्सटर मुकुल शर्माने आयएमआय डेटाबेसवर विवो वी23ई स्मार्टफोन बघितला आहे. या लिस्टिंगमध्ये नाव आणि मॉडेल नंबर व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. विवो वी23 सीरीजमधील फोनची माहिती समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीरिज यावर्षी लाँच झालेल्या वी 21 सीरिजची जागा घेईल, त्यामुळे यात मिळणारे स्पेक्स अपग्रेडेड असतील अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त या सीरिजबाबत इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.
Vivo V21 Pro आणि Vivo Y72 5G ची किंमत
भारतात Vivo V21 Pro ची किंमत 32,990 रुपयांपासून सुरु होऊ शकते, अशी माहिती 91Mobiles च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. हा स्मार्टफोन या महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. 5G नेटवर्क, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग ही या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये असतील.
Vivo Y72 5G चा 8GB रॅम व्हेरिएंट भारतात 22,990 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. हा विवो स्मार्टफोन 15 जुलै रोजी भारतात MediaTek Dimensity 700 चिपसेट, 64MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.
Vivo चा पहिला Smartwatch आणि Vivo X70 सीरिज
Vivo ने रिटेल पार्टनर्स सोबत मिळून स्मार्टवॉच संबंधित एक सर्वे केल्याची माहिती 91mobile ने दिली आहे. हा सर्वे नवीन स्मार्टवॉच लाँच करण्याच्या नियोजनाचा भाग असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. ही बातमी खरी ठरल्यास काही महिन्यातच आपल्या Vivo Smartwatch बाजारात बघायला मिळेल. त्याचबरोबर कंपनी सप्टेंबरमध्ये IPL 2021 दरम्यान भारतात Vivo X70 सीरिज लाँच करू शकते. Vivo X70 सीरिज गेल्यावर्षीच्या Vivo X60 सीरिजची जागा घेईल.