मुंबई- व्होडाफोन कंपनी त्यांच्या ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याच्या मार्गावर आहे. जिओ व एअरटेलला टक्कर देण्यासाठी कंपनीने त्याच्या 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणाऱ्या स्वस्त प्लॅनला रिवाइज केलं आहे. आता या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 1.4 जीबी हायस्पीड इंटरनेट मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगही दिली जाणार आहे. युजर्सला दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत 198 रूपये आहे. कंपनीने हा प्लॅन एअरटेलच्या 199 व जिओच्या 149 रूपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी बाजारात आणल्याची चर्चा आहे.
आयडियाच्या 149 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 1 जीबी हायस्पीड डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही दिली जाते. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या 28 दिवसात एकुण 1 जीबी डेटा दिला जातो. तर दुसरीकडे जिओच्या 149 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला आता दररोज हायस्पीड 1.5 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगही दिलं जातं. याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असून यात एकुण 42 जीबी डेटा दिला जातो. तसंच जिओ अॅपचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं. एअरटेलच्या 149 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 1 जीबी हायस्पीड डेटा मिळतो. तसंच अनलिमिटेड कॉलिंगही आहे. 28 दिवसांसाठी हा प्लॅन असून यामध्ये एअरटेलत्या टिव्ही आणि इतर अॅप्सचं सब्सक्रिप्शन मोफत दिलं जातं.
एअरटेलच्या 199 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला आता दररोज 1.4 जीबी हायस्पीड डेटा मिळतो. तसंच अनलिमिटेड कॉलिंग फ्री असून प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची आहे. जिओ 349 च्या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगच्या बरोबर दररोर 1.5 जीबी हायस्पीड इंटरनेट देतं, याची मर्यादा 70 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकुण 105 जीबी डेटा असेल.