iPhone च्या नावातील ‘i’ चा अर्थ तरी काय?
By सिद्धेश जाधव | Published: January 19, 2022 06:44 PM2022-01-19T18:44:25+5:302022-01-19T18:44:58+5:30
iPhone च्या नावातील ‘i’ चे अर्थ अनेक आहेत.
जरी तुमच्याकडे iPhone नसला तरी तुमच्या आजूबाजूला आयफोन वापरणारे असतील. तुम्ही लोकमतच्या टेक सेगमेंटमधील लेख वाचत आहात म्हणजे तुम्ही आयफोन विषयी इथे देखील वाचलं असेलच. 2007 मध्ये पहिला आयफोन बाजारात आला होता. या क्रांतिकारी स्मार्टफोननं मोबाईलचं विश्वच बदलून टाकलं. अनेक भारतीयांसाठी ‘ड्रीम फोन’ असणाऱ्या आयफोनच्या नावातील ‘i’ चा फुलफॉर्म तरी काय?
तुम्ही कुठे ना कुठे तरी वाचलं असेल कि या अक्षराचा फुलफॉर्म “Internet” आहे. कारण पहिल्या आयफोननं मोबाईलवर इंटरनेट अॅक्सेसला प्रसिद्धी दिली होती. किंवा हा फोन मोठ्या प्रमाणावर पर्सनलाईज करता येतो म्हणून सर्वनाम म्हणून “I” वापरण्यात आला आहे. खरं तर या छोट्या अक्षराचे पाच अर्थ आहेत.
आयफोन अस्तित्वात येण्याआधीपासूनच अॅप्पल प्रोडक्ट्समध्ये “I” चा वापर केला जात होता. 1998 मध्ये आलेला iMac कंप्यूटर त्याचाच उदाहरण. तेव्हा कंप्युटर्समध्ये देखील इंटरनेट नव्हतं. त्यामुळे “I” मॅकमधील इंटरनेट क्षमता दर्शवत होता.
परंतु जेव्हा पहिला iMac लाँच झाला होता तेव्हा “I” चे अनेक अर्थ होते. जेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनी iMac जगासमोर ठेवला होता तेव्हा प्रेझेन्टेशनमध्ये पाच शब्द दिले होते. त्या प्रेझेन्टेशननुसार ‘I’ म्हणजे internet, individual, instruct, inform आणि inspire. परंतु असे जरी असले तरी या अक्षराचा अधिकृत असा कोणताही अर्थ नाही, असं Comparitech चे पॉल बिशप सांगतात. या अक्षराचे अनेक अर्थ काढता येतात, असं देखील ते म्हणतात.
जरी “I” म्हणजे “Internet” अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामागे 2007 मध्ये आलेल्या आयफोन मधील इंटरनेट अॅक्सेसचं योगदान आहे. परंतु त्यानंतर आलेल्या आणि इंटरनेट नसलेल्या प्रोडक्ट्सचं नाव देखील I ने सुरु झाले होते. ज्यात सुरुवातीच्या iPod चा समावेश आहे. जरी या आयकॉनिक “I” चा अधिकृत असा अर्थ नसला तरी या छोट्याश्या अक्षराने ब्रँड ओळख दिली आहे, एवढं मात्र नक्की.
हे देखील वाचा:
तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट
आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर