अमेरिकन बिझनेसमॅन एलन मस्क हे नुकतेच जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. एलन मस्क इलेक्ट्रिक कार मेकर टेस्ला आणि स्पेस कंपनी स्पेसएक्सचे फाउंडर आहेत. त्यांनी अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांना मागे सोडलं आणि ते आता जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. एलन मस्क यांचं एक ट्विट सध्या फारच गाजतंय. त्यात त्यांनी 'सिग्नल'(Signal) हे अॅप वापरा असं लिहिलंय. म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हॉट्सअॅप नाही तर सिग्नल अॅप वापरतो. त्यांच्या ट्विटनंतर १० मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे अॅप डाउनलोड केलंय. लोक व्हॉट्सअॅपवरून सिग्नलवर शिफ्ट होत आहेत. पण या सिग्नल अॅपमध्ये असं वेगळं आहे तरी काय? चला जाणून घेऊ....
एलन मस्कने ट्विट केल्यानंतर जगभरातील लोक सिग्नल हे App वापरू लागले आहे. प्ले स्टोरवर तर हे App टॉप रॅंकिंग करत आहे. म्हणजे व्हॉट्सअॅपला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे App फ्री आहे.
Signal का आहे WhatsApp पेक्षा वेगळं.....काय आहेत प्रायव्हसी फीचर्स...
उदाहरणावरून समजून घेऊ की, Signal अॅपवर फीचर आहे जे एनेबल केल्यावर तुम्ही आणि तुमच्यासोबत बोलत असलेले कुणीही ते स्क्रीनशॉट घेऊ शकत नाहीत. इतकेच नाही तर दुसरं कुणी चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ नये याची काळजी अॅप घेतं.
WhatsApp तुमची आयडेंटिफिकेशन, यूसेज डेटा, परचेस डेटा, लोकेशन, कॉन्टॅक्ट, यूजर कॉन्टॅक्ट, यूजर आयडी, डिवाइस आयडीपासून सर्व प्रकारचा पर्सनल डेटा कलेक्ट करतं. पण Signal यातील कोणत्याही प्रकारचा डेटा कलेक्ट करत नाही.
Signal अॅपचा सोर्स कोड पब्लिक डोमेनमध्ये आहे म्हणजे कुणीही सिक्युरिटी एक्सपर्ट याच्या सिक्युरिटीची टेस्टिंग करू शकतो. म्हणजे हे अॅप काय आहे, त्याच्या आत काय आहे, डेटा कुठे जातोय, कशाप्रकारे यूज केलं जातं हे सगळं बघता येऊ शकतं.
सिक्युरिटी फीचरबाबत बोलायचं तर Signal अॅपमध्ये जास्त लवकर सिक्युरिटी फीचर्स आणि सिक्युरिटी पॅच मिळतात. सिग्नल अॅपवर खूप आधीपासून Disappearing हे फीचर आहे. जे नुकतंच व्हॉट्सअॅपवर आलं आहे. पण Signal चं हे फीचर जास्त सिक्योर आणि सेफ आहे.
६ बेस्ट फीचर्स
प्रायव्हसीसाठी WhatsApp सारखं Signal सुद्धा तुम्हाला End-to-end encryption ची सुविधा देतं. म्हणजे मेसेज Sender आणि Receiver शिवाय दुसरं कुणी बघू शकत नाही.
Group Chat
WhatsApp प्रमाणेच तुम्ही सिग्नल अॅपवरही ग्रुप बनवू शकता. पॉप्युलर मेसेजिंग अॅप प्रमाणेच तुम्ही सिग्नलमध्ये अनेक लोकांना admin बनवू शकता. यासोबतच ग्रुप इन्फोही एडीट करू शकता.
Media sharing
Signal App मध्ये तुम्ही फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकता. दुसऱ्या मेसेजिंग अॅपप्रमाणेच सिग्नलवरही प्रत्येक प्रकारच्या फाइलला सपोर्ट करतं.
Desktop support/ Audio messages/ Calling support
हे अॅप तुम्ही केवळ मोबाइलवरच नाही तर लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरही वापरू शकता. सोबतच तुम्ही टेक्स्ट मेसेजऐवजी ऑडिओही पाठवू शकता. तसेच ज्या प्रमाणे तुम्ही WhatsApp वर कॉलिंग करता. तसंच तुम्ही सिग्नलवरही करू शकता.