भारीच! ना लास्ट सीन, ना ऑनलाईन पण ऑफलाईन राहूनही Whatsapp वर करा "असं" मजेशीर चॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:11 PM2020-12-10T14:11:17+5:302020-12-10T14:15:13+5:30
WhatsApp : काही लोकांना आपण ऑनलाईन आहोत ते इतरांना समजायला नको असं वाटतं असतं. अशाच मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे.
नवी दिल्ली - Whatsapp हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप असून ते युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपवर समोरच्या व्यक्तीला मेसेज केल्यावर आपण ऑनलाईन आहोत की ऑफलाईन याची माहिती मिळते. तसेच लास्ट सीनच्या माध्यमातून याआधी किती वाजता समोरची व्यक्ती अथवा नातेवाईक, मित्रमैत्रिणी ऑनलाईन होते याबाबत समजतं. मात्र काही लोकांना आपण ऑनलाईन आहोत ते इतरांना समजायला नको असं वाटतं असतं. अशाच मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे.
व्हॉट्सअॅपवर आता ऑफलाईन राहूनही चॅटिंगची मजा घेता येणार आहे. तसेच तुम्ही ऑनलाईन आहात हे कोणाला कळणार देखील नाही. रात्री उशीरापर्यंत चॅटिंग करण्याची सवय असेल तर अशा लोकांना याचा खूप फायदा होणार आहे. अनेकदा समोरची मंडळी ऑनलाईन आहे हे पाहून विनाकारण काही लोक मेसेज करत असतात. त्यांना रिप्लाय देणं काहीवेळा कंटाळवाणं असतं. अशावेळी अशापद्धतीने ऑफलाईन राहून चॅटिंग करता येणार आहे. कसं ते जाणून घेऊया.
कोणालाच समजणार नाही तुम्ही ऑनलाईन आहात; "या" ट्रिक्स करा फॉलो
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून WA bubble for chat हे अॅप डाऊनलोड करा.
- त्यानंतर अॅप अनेक अॅक्सेसिबिलिटी परमिनशन्स मागेल. त्यावर तुम्हाला allow करावे लागेल.
- आता व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेजेस तुम्हाल बबल्स मध्ये येतील.
- या चॅटिंगमध्ये तुम्ही कोणालाही ऑनलाईन दिसणार नाही. तसेच ऑफलाईन राहून आरामात सहज चॅटिंग करू शकता.
- यासोबतच यामध्ये कोणालाही तुमचा लास्ट सीन दिसणार नाही.
मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्लाhttps://t.co/KQnwZZ64qP#SBI#Bank
— Lokmat (@MiLOKMAT) December 5, 2020
WhatsApp OTP Scam म्हणजे नेमकं काय?, जाणून घ्या कसा करायचा फ्रॉडपासून बचाव
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र सध्या हे हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअॅपशी संबंधित नवनवीन फ्रॉड केले जात आहेत. सध्या एका नव्या प्रकारचा स्कॅम हा व्हॉट्सअॅपवर सुरू करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने एखादा मित्रचं आपलं अकाऊंट हॅक करू शकतो. WhatsApp OTP स्कॅम म्हणजे नेमकं काय? आणि यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया. व्हॉट्सअॅप ओटीपी स्कॅममध्ये स्कॅमर सर्वप्रथम युजर्सना त्याच्याच एका मित्राच्या नावाने मेसेज पाठवतात. तसेच तुमचा मित्र अडचणीत असल्याचं त्यामध्ये सांगितलं जातं. अनेकदा हॅकर्स मित्रांच्या नंबरवरूनच मेसेज करतात.
अलर्ट! WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर, असा मेसेज आल्यास वेळीच व्हा सावधhttps://t.co/ZLTZGjz1kz#WhatsApp#Technology
— Lokmat (@MiLOKMAT) November 23, 2020
हॅकर्सच्या जाळ्यात अडकून मेसेजला रिप्लाय केल्यास हॅकर्सकडून आणखी एक मेसेज पाठवला जातो. त्यानंतर ओटीपी विचारला जाईल. चुकून हा मेसेज तुम्हाला पाठवला असं सांगून हॅकर तोच मेसेच पुन्हा त्याला फॉरवर्ड करायला सांगेल. मात्र यामागचं खरं कारण म्हणजे हे मुद्दाम ओटीपीच्या माध्यमातून युजर्सचं अकाऊंट हॅक करण्यासाठी करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सनी सावध राहणं गरजेचं आहे. ओटीपी सांगितल्यास तुमच्या नंबरच्या मदतीने हॅकरच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू होईल. कारण व्हॉट्सअॅप नव्या डिव्हाईसमध्ये सुरू करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज असते. तो हॅकरने युजर्सकडून मागितलेला असतो. याचाच गैरफायदा घेऊन हॅकर्स आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैसे मागू शकतात अथवा त्यांना ब्लॅकमेल करण्यासारखे फ्रॉड करतात.
FASTag बाबत नवीन अपडेट, असं केल्यास भरावा लागणार नाही दुप्पट टोलhttps://t.co/IqWmJhhMJP#FASTag#Car
— Lokmat (@MiLOKMAT) December 2, 2020