आईने फोनच्या मदतीने शोधला 3 महिन्यांच्या लेकाला झालेला कॅन्सर; फ्लॅश लाइट वापरली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 04:30 PM2024-02-29T16:30:17+5:302024-02-29T16:34:07+5:30
स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. विविध प्रकारे फोनचा वापर होत असतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. विविध प्रकारे फोनचा वापर होत असतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मोबाईलच्या मदतीने एका आईने आपल्या 3 महिन्यांच्या मुलाच्या डोळ्याला झालेला कॅन्सर शोधला. त्यासाठी तिने प्लॅश लाईटचा वापर केला.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये एका महिलेला तिच्या मुलाला असलेल्या डोळ्याच्या कॅन्सरची माहिती मिळाली, जे अत्यंत दुर्मिळ आहे. यासाठी तिने आपल्या स्मार्टफोनचा वापर केला आहे.
सारा हेजेस असं या महिलेचं नाव आहे. एके दिवशी सारा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. मग तिचं लक्ष तिच्या तीन महिन्यांच्या मुलाकडे गेले, ज्याचे नाव थॉमस आहे. मुलाच्या डोळ्यांत काहीतरी वेगळेच दिसलं, जे पांढऱ्या रंगाचं होतं आणि चमकत होतं.
साराने यानंतर स्मार्टफोन उचलला आणि फ्लॅश लाईटचा वापर केला. यानंतर तिने त्याचे काही फोटोही क्लिक केले. तिला याबाबत जाणून घेण्याची इच्छा झाली. आईने आपल्या मुलाची समस्या जाणून घेण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. इंटरनेटवर अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आईला हा प्रकार कळला. कॅन्सर असू शकतो असं इंटरनेटवर सांगितलं. यानंतर ती डॉक्टरांकडे गेली आणि तिथून कॅन्सरची सुरुवात असल्याचं कन्फर्मेशन मिळालं. यानंतर तिच्या मुलाला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.
थॉमसच्या डोळ्यावर उपचार करण्यात आले. डोळ्यांच्या कॅन्सरचा हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असून त्याचा प्रसार झपाट्याने होतो. केमोथेरपीच्या अनेक फेऱ्यांनंतर थॉमस आता बरा आहे. त्याच्या आईने सुरुवातीला तत्परता दाखवली. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर उपचार पूर्ण झाले.