नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. याच दरम्यान कोरोना व्हायरसच्या भीतीने गेल्या वर्षभरापासून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असून आता अनेकांसाठी वर्क फ्रॉम होम नॉर्मल झाले आहे. वर्क फ्रॉम होम मुळे कंपन्यांना आता मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, वर्क फ्रॉम होम गुगलसाठी अत्यंत फायद्याचं ठरलं आहे. गुगलने वर्क फ्रॉम होममुळे तब्बल 1 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 7400 कोटी रुपये वाचवले आहेत. गुगलचे कर्मचारी गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने प्रमोशन आणि इंटरनटेमेंटचा खर्च कमी केला. त्यातून कंपनीला 268 मिलियन डॉलर म्हणजेच 1980 कोटी रुपये वाचवता आले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कोरोनामुळे हे शक्य झाले आहे. दरवर्षी जर खर्चाचा एकूण विचार केला तर 1 बिलियन डॉलर म्हणजेच 7 हजार 400 कोटी रुपये अधिक कंपनी खर्च करीत असते. त्यामुळे वर्षभरात कंपनीला काहीच करावे लागले नसल्याने हा संपूर्ण खर्च वाचला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वच जण गेले कित्येक महिने घरी आहेत. याच दरम्यान इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे गुगलचा फायदा झाला आहे.
गुगलचा रेवेन्यू हा जवळपास 34 टक्के वाचला आहे. कंपनी या वर्षीच्या अखेर पर्यंत ऑफिसमध्ये काम सुरू करण्याचं प्लॅनिंग करीत आहे. चीफ फायनान्शियल ऑफिसर रुथ पोराटने गुंतवणूकदारांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनी हायब्रिड मॉडलवर लोकांना ऑफिसला बोलावण्याची योजना तयार करत आहे. ज्यामध्ये ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत कमी असणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....