हवेतील व्हायरस नष्ट करण्यासाठी एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या Xiaomi च्या Air Purifier 4 Pro ची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: September 8, 2021 05:12 PM2021-09-08T17:12:29+5:302021-09-08T17:12:53+5:30

Xiaomi Air Purifier: Xiaomi ने लाँच चीनमध्ये नवीन एयर प्युरिफायर लाँच केला आहे, जो हवेतील प्रदुर्षणासह व्हायरस देखील नष्ट करतो.  

Xiaomi mijia air purifier 4 pro launched price cny 1299 pm2 5 partical h1n1 virus remover   | हवेतील व्हायरस नष्ट करण्यासाठी एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या Xiaomi च्या Air Purifier 4 Pro ची वैशिष्ट्ये 

हवेतील व्हायरस नष्ट करण्यासाठी एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या Xiaomi च्या Air Purifier 4 Pro ची वैशिष्ट्ये 

Next

Xiaomi ने चीनमध्ये MIJIA Air Purifier 4 Pro लाँच केला आहे. हा 2019 मध्ये सादर झालेल्या मीजिया एयर प्युरिफायर 3 चा अपग्रेड व्हर्जन आहे. हा नवीन एयर प्युरिफायर घरातील हवा शुद्ध करण्याचे काम करतो. तसेच हवेतील एच1एन1 व्हायरस, ई. कोली, स्टॅफिलोकोकस ऑरियस सारखे अनेक व्हायरस व हवेतील रोगकारक घटक नष्ट करण्यासाठी यात अँटी-व्हायरस डबल कोटिंग देण्यात आली आहे.  

MIJIA Air Purifier 4 Pro अनेक अपग्रेड सह सादर करण्यात आला आहे. यातील 360-डिग्री सराऊंड एयर इनटेक डिजाइन दर मिनिटाला 8330 लिटर हवा शुद्ध करू शकते. यातील फिल्टर्स धूळ, घरातील पाळीव प्राण्यांचे केस, परागकण व PM2.5 कण फिल्टर करू शकतात. तसेच हे फिल्टर्स खोलीतील दुर्गंध देखील नष्ट करू शकतात.  

MIJIA Air Purifier 4 Pro हवा शुद्ध करताना जास्त आवाज करत नाही. या डिवाइसचा ऑपरेटिंग नॉइज 33 डेसिबल आहे, असा कंपनीने दावा केला आहे. यात एयर प्यूरिफायरमध्ये एक OLED टच स्क्रीन देण्यात आली आहे, जी रियल टाइम PM2.5 डेटा दखवते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन फिल्टरची एल्डिहाइड नष्ट करण्याची क्षमता 185 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. हा डिवाइस एका तासात 95.37 टक्के फॉर्मलाडेहाइड आणि 96 टक्के टोल्यूनी नष्ट करू शकतो आणि न दिसणारे विषारी वायू कमी करण्यास मदत करतो.  

Xiaomi MIJIA Air Purifier 4 Pro ची किंमत  

Xiaomi MIJIA Air Purifier 4 Pro सध्यातरी फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. इथे या एयर प्युरिफायरची किंमत 1,499 युआन (जवळपास 17,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. परंतु इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हा प्युरिफायर 1,299 युआन (जवळपास 14,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल. 9 सप्टेंबरपासून हा डिवाइस खरेदीसाठी उपलब्ध होईल. सध्या याची प्री बुकिंग JD.com वर सुरु आहे. 

Web Title: Xiaomi mijia air purifier 4 pro launched price cny 1299 pm2 5 partical h1n1 virus remover  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :xiaomiशाओमी