108MP कॅमेरा, 8GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; Redmi Note 11 सीरिज 13,400 रुपयांपासून सुरु  

By सिद्धेश जाधव | Published: January 27, 2022 11:58 AM2022-01-27T11:58:37+5:302022-01-27T11:58:49+5:30

Redmi Note 11 and 11S Launch Price: Redmi Note 11 आणि Redmi Note 11s जागतिक बाजारात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह सादर करण्यात आले आहेत.

Xiaomi Redmi Note 11 and 11s launched know specs price sale  | 108MP कॅमेरा, 8GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; Redmi Note 11 सीरिज 13,400 रुपयांपासून सुरु  

108MP कॅमेरा, 8GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; Redmi Note 11 सीरिज 13,400 रुपयांपासून सुरु  

googlenewsNext

Xiaomi नं आपली ‘रेडमी नोट 11’ सीरीज जागतिक बाजारात लाँच केली आहे. ही सीरिज कमी किंमतीत चांगले स्पेक्स देण्यासाठी लोकप्रिय आहे. सीरिजमध्ये कंपनीनं Redmi Note 11, Redmi Note 11S, Redmi Note 11 Pro 4G आणि Redmi Note 11 Pro 5G असे चार स्मार्टफोन्स सादर केले आहेत. या लेखात आपण किफायतशीर रेडमी नोट 11 आणि रेडमी नोट 11एस ची माहिती घेणार आहोत.  

Redmi Note 11 आणि Redmi Note 11s चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11 आणि Redmi Note 11S वेगवेगळ्या प्रोसेसर, रॅम व्हेरिएंट आणि कॅमेरा सेन्सर्ससह बाजारात आले आहेत. परंतु दोघांचे काही स्पेक्स एकसारखे आहेत, ज्यात डिस्प्लेचा समावेश आहे. दोन्ही फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह सादर करण्यात आले आहेत. ज्यात पंच-होल डिजाईन, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा मिळते.  

हे फोन्स अँड्रॉइड11 आधारित मीयुआय 13 वर चालतात. सिक्योरिटी रेडमी 11 सीरिजमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात आयआर ब्लास्टर आणि आयपी53 वॉटर रेजिस्टन्स मिळतो. दोन्ही फोन्समधील 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.  

प्रोसेसिंग पॉवरसाठी Redmi Note 11 मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6GB पर्यंत RAM मिळतो. तर Redmi Note 11S स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो जी96 चिपसेटला सपोर्ट करतो आणि यात 8GB पर्यंत RAM देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 11 आणि नोट 11एस क्वॉड रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आले आहेत. Redmi Note 11S मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळतो. परंतु Redmi Note 11 50मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. बाकी सेन्सर एकसारखे आहेत ज्यात 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एस मॉडेलमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, तर रेडमी नोट 11 मध्ये 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  

Redmi Note 11 आणि Redmi Note 11s ची किंमत 

  • Redmi Note 11 4GB/64GB: 179 डॉलर्स (जवळपास 13,400 रुपये) 
  • Redmi Note 11 4GB/128GB: 199 डॉलर्स (जवळपास 14,900 रुपये) 
  • Redmi Note 11 6GB/128GB: 229 डॉलर्स (जवळपास 17,200 रुपये) 
  • Redmi Note 11S 6GB/64GB: 249 डॉलर्स (जवळपास 18,700 रुपये) 
  • Redmi Note 11S 6GB/128GB: 279 डॉलर्स (जवळपास 20,900 रुपये) 
  • Redmi Note 11S 8GB/128GB: 299 डॉलर्स (जवळपास 22,400 रुपये)  

लवकरच हे फोन्स भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे आणि यांची देशातील किंमत यापेक्षा कमी असू शकते.  

हे देखील वाचा:

Web Title: Xiaomi Redmi Note 11 and 11s launched know specs price sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.