ट्रुकॉलर अॅपद्वारे आजपर्यंत आलेला फेन नंबर कोणाचा आणि कोठून आहे हे समजत होते. तसेच नावाने शोधल्यास त्याचा नंबरही मिळत होता. मात्र, आता आलेला फोन रेकॉर्डही करता येणार आहे.
बऱ्याचदा धमकी किंवा निनावी फोन येतात, मात्र त्यांच्याशी होणारे बोलणे रेकॉर्ड करता येत नसल्याने एखादा गुन्हा असेल तर पुरावे सापडत नव्हते. फोन रेकॉर्ड करण्यासाठी वेगळे अॅप डाऊनलोड करावे लागते. यामध्ये स्पेसही जाते. ट्रुकॉलर अॅपवर ही सुविधा मिळणार असल्याने ही जागा वाचणार आहे. यासाठी या अॅपचे प्रिमियम व्हर्जन घ्यावे लागणार आहे.
महत्वाचे म्हणजे, कॉल रेकॉर्डची सुविधा मिळण्य़ासाठी ट्रुकॉलरचे आताचे व्हर्जन 9.13.7 किंवा त्यावरचे व्हर्जन असावे लागणार आहे. अॅपवर लॉगइन केल्यानंतर तेथे कॉल रेकॉर्डचा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक करावे लागणार आहे. येथे 14 दिवसांचे ट्राय़ल करता येणार आहे. यानंतर या सुविधेसाठी काही पैसे मोजावे लागणार आहेत.