झेंडर : काहीही पाठवा अगदी फुकट

By अनिल भापकर | Published: January 11, 2018 08:29 PM2018-01-11T20:29:50+5:302018-01-11T20:50:09+5:30

पूर्वी फोटो किंवा व्हिडिओ फाइल्स ची साईझ आजच्या तुलनेनं फार कमी असायची . मात्र आता एच डी चा जमाना आहे. स्मार्टफोन वापरणार्‍यांची भूक वाढली आणि आता आपण फक्त फाईल किंवा गाणे किंवा फोटोच ट्रान्सफर करीत नाही, तर मित्रांना आता आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेला संपूर्ण चित्रपट हवा असतो किंवा मित्राच्या वाढदिवसाचे केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हवे असते.स्मार्टफोन मधील कॅमेरे सुद्धा एच डी झालेले आहेत. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ ची फाईल साईझ ही फार वाढलेली आहे . त्यामुळे ह्या फाइल्स ई-मेल किंवा व्हाट्सअँप करायच्या म्हटल्या तर शक्य होत नाही. अशावेळी काय करायचे ?

Zenderer: Transfer anything FREE and fast! | झेंडर : काहीही पाठवा अगदी फुकट

झेंडर : काहीही पाठवा अगदी फुकट

googlenewsNext
ठळक मुद्देया मध्ये हंगामा हे नवीन फिचर सध्या आले असून याचा वापर करून तुम्ही गाणी प्ले करू शकता तसेच डाउनलोड आणि शेअर सुद्धा करू शकता.झेंडर अँपच्या माध्यमातून फाईल ट्रान्सफर करण्यासाठी कुठल्याही केबलची गरज नाही किंवा इंटरनेट अथवा वायफाय कनेक्शनचीही गरज नाही. Xender - File Transfer & Share हिंदी भाषेतसुद्धा उपलब्ध आहे.

पूर्वी फोटो किंवा व्हिडिओ फाइल्स ची साईझ  आजच्या तुलनेनं फार कमी असायची . मात्र आता एच डी चा जमाना आहे. स्मार्टफोन वापरणार्‍यांची भूक वाढली आणि आता आपण फक्त फाईल किंवा गाणे किंवा फोटोच ट्रान्सफर करीत नाही, तर मित्रांना आता आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेला संपूर्ण चित्रपट हवा असतो किंवा मित्राच्या वाढदिवसाचे केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हवे असते.स्मार्टफोन मधील कॅमेरे सुद्धा एच डी झालेले आहेत. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ ची फाईल साईझ ही फार वाढलेली आहे . त्यामुळे ह्या फाइल्स ई-मेल किंवा व्हाट्सअँप करायच्या म्हटल्या तर शक्य होत नाही. 

जसे काही वर्षांपूर्वी आपल्याला मित्रांसोबत एखादे गाणे किंवा फोटो अथवा फाईल शेअर किंवा ट्रान्सफर करायची असल्यास सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ब्ल्यू टूथ. म्हणजे दोन्ही स्मार्ट फोनमधील ब्लू टूथ चालू करून आपण आपल्या मित्राला हवी असलेली फाईल ट्रान्सफर करीत असू;  या सर्वांची फाईल ही काही शेकडो एम.बी.मध्ये किंवा जी.बी.मध्येसुद्धा असते. अशा वेळी जर या फाईल्स आपण ब्ल्यू टूथच्या माध्यमातून एकमेकांना ट्रान्सफर केल्या तर यामध्ये प्रचंड वेळ जातो. एवढी मोठी व्हिडीओ फाईल ईमेल करू शकत नाही किंवा व्हॉट्सअँपच्या माध्यमातून शेअर करू शकत नाही; कारण याला फाईल साइजच्या र्मयादा आहेत; फाईल तर मित्राला पाठवायची आहे; मग कसे करणार? मात्र तुमची ही समस्या सोडविण्यासाठी एक अँण्ड्रॉईड अँप तुम्हाला मदत करील; त्याचे नाव आहे - झेंडर (Xender - File Transfer & Share).

काय आहे हे अँप?

 १) झेंडर हे अँप गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध असून, जगभरात जवळपास लाखो यूर्जस झेंडर फाईल ट्रान्सफरसाठी वापरतात.

२) या मध्ये हंगामा हे नवीन फिचर सध्या आले असून याचा वापर करून तुम्ही गाणी प्ले करू शकता तसेच डाउनलोड आणि शेअर सुद्धा करू शकता.

२) झेंडर अँपच्या माध्यमातून फाईल ट्रान्सफर करण्यासाठी कुठल्याही केबलची गरज नाही किंवा इंटरनेट अथवा वायफाय कनेक्शनचीही गरज नाही. कुठलाही छुपा डेटा युजेस यामध्ये होत नाही. याच झेंडर अँपला पूर्वी फ्लॅश ट्रान्सफर या नावानेदेखील ओळखले जायचे.

३) झेंडर अँपच्या मदतीने तुम्ही काहीही ट्रान्सफर करू शकता. जसे की, तुमच्या स्मार्ट फोनमधील कॉन्टॅक्ट, फाईल्स, फोटोज्, गाणी, विविध प्रसंगांचे फाईल, साइज जास्त असलेले फोटो, एवढंच काय तुम्ही अँपसुद्धा तुमच्या मित्रांच्या स्मार्ट फोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.

४) झेंडरच्या फाईल ट्रान्सफरचा स्पीड हा ब्ल्यू टूथपेक्षा दोनशे पटीने अधिक असतो. तसेच चाळीस एम बी प्रति सेकंद एवढा प्रचंड स्पीडने  फाईल ट्रान्सफर करू शकता. म्हणजे एखादा अख्खा चित्रपट जरी ट्रान्सफर करायचा असला तरी काही मिनिटांतच ट्रान्सफर करू शकता. तुमच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ, ज्याची साईज ही जीबी आहे, तोही सहजगत्या तुम्ही झेंडरच्या मदतीने तुमच्या मित्राला पाठवू शकता.

५) झेंडरचे अजून एक जादूई फीचर म्हणजे याचा असलेला क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट. याचा अर्थ तुमच्याजवळ अँण्ड्रॉईड मोबाइल आहे आणि तुमच्या ज्या मित्राला फाईल ट्रान्सफर करायची आहे त्याच्याकडे आयफोन आहे; तरीसुद्धा काळजी करण्याची गरज नाही. कारण यामध्ये अँण्ड्रॉईड स्मार्ट फोनमधून आयफोनमध्ये आणि आयफोनमधून अँण्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये फाईल ट्रान्सफर करता येते.टायझेन , विंडोज आदी प्लॅटफॉर्म सपोर्ट सुद्धा यामध्ये आहे.

६) आजकाल नवीन स्मार्ट फोन बाजारात आला की, तो विकत घेणारे अनेक हौशी मंडळी आहेत. नवीन स्मार्ट फोन विकत घ्यायला काहीच वेळ लागत नाही; मात्र खरा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे तुमच्या जुन्या स्मार्ट फोनमधील तुमचे कॉन्टॅक्ट, डेटा, अँप्स आदिंचा. कॉन्टॅक्ट आणि डेटा तर कसा तरी ट्रान्सफर करता येतो; पण अँप मात्र परत डाऊनलोड करा किंवा इन्स्टॉल करा. म्हणजे डोक्याला ताप तर होतोच; शिवाय वेळ जातो तो वेगळाच! मात्र या समस्येवर रामबाण उपाय या झेंडर अँपमध्ये आहे. यामध्ये फोन रिप्लिकेट नावाचे एक फीचर आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्ट फोनमधील डेटा, फाईल्स, अँप, गाणी, व्हिडीओज् अगदी काही क्लिकमध्ये नवीन स्मार्ट फोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.झेंडर ( Xender - File Transfer & Share)हे हिंदी भाषेतसुद्धा उपलब्ध आहे.

Web Title: Zenderer: Transfer anything FREE and fast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.