Join us  

अस्ताद काळे नकळत सारे घडले या मालिकेत साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 6:30 AM

अस्तादने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला स्टार प्रवाहच्या अग्निहोत्र, पुढचे पाऊल या मालिकांंमध्ये काम केले होते. आता तो पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करण्यास सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देमध्यमवर्गीय कुटुंबातला, साधासरळ, आईची सेवा करणारा असा आदर्श मुलगा अशी या मालिकेत त्याची भूमिका असणार आहे. अस्तादची मालिकेत एंट्री झाल्यानंतर या मालिकेला चांगलेच वळण मिळणार आहे.

अस्ताद काळेने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचे तिला काही सांगायचंय हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. या नाटकात तेजश्री प्रधान त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. अस्ताद नुकताच बिग बॉस मराठी या कार्यक्रमात झळकला होता. या कार्यक्रमातील शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये तो होता. या कार्यक्रमामुळे तर त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. याआधी त्याने सरस्वती या मालिकेत राघव ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील त्याची आणि सरस्वतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. अस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

अस्तादने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला स्टार प्रवाहच्या अग्निहोत्र, पुढचे पाऊल या मालिकांंमध्ये काम केले होते. आता तो पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. तो नकळत सारे घडले या मालिकेत लवकरच धमाकेदार एण्ट्री करणार आहे. या मालिकेत त्याचे आजवर न पाहिलेलं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा खूपच खास आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातला, साधासरळ, आईची सेवा करणारा असा आदर्श मुलगा अशी या मालिकेत त्याची भूमिका असणार आहे. अस्तादची मालिकेत एंट्री झाल्यानंतर या मालिकेला चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत काम करण्यास अस्ताद खूपच उत्सुक असून त्याच्या फॅन्सना त्याला लवकरच या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

अस्ताद त्याच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सध्या चांगलाच खूश आहे. अस्तादची एक प्रेयसी असून ती अभिनयसृष्टीशीच संबंधित आहे असे अस्तादनेच बिग बॉस मराठीच्या घरात सांगितले होते. ही अभिनेत्री स्वप्नाली पाटील असून तिने पुढचे पाऊल या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते. 

नकळत सारे घडले ही मालिका सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळते. 

टॅग्स :अस्ताद काळे