Join us

हम तो तेरे आशिक है या मालिकेतील दीप्ती केतकरला या भूमिकेसाठी घ्यावी लागली ही मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 7:32 AM

सुंदरता ही साधेपणात असते असं म्हणतात ते झी मराठी वरील लोकप्रिय विनोदी मालिका 'हम तो तेरे आशिक है' मधील ...

सुंदरता ही साधेपणात असते असं म्हणतात ते झी मराठी वरील लोकप्रिय विनोदी मालिका 'हम तो तेरे आशिक है' मधील कावेरी वहिनींकडे पाहिल्यावर अगदी खरं वाटतं. सुंदर, सालस आणि तितकीच निरागस अशा कावेरीने तिच्या साधेपणाने सर्व रसिक प्रेक्षकांवर भुरळ पडली आहे. कावेरी ही मालिकेत मुळची कोल्हापूरची दाखवण्यात आली आहे आणि तिचे पात्र साकारणारी दीप्ती केतकर ही मुळची मुंबईची आहे. मुंबईची मुलगी असलेली दीप्ती मालिकेत मात्र तिच्या अभिनयाने कोल्हापुरी तडका देऊन जाते. ती कोल्हापुरी बोलण्याचा अभिनय करते असे मालिका पाहाताना कुठेही वाटत नाही. कलाकारांना अभिनय करताना अभिनयासोबतच हे सर्व पैलू लक्षात ठेवावे लागतात. दीप्तीने या कोल्हापुरी बोलीसाठी वेगळी मेहनत देखील घेतली आहे. तिच्या या पैलूबद्दल बोलताना दीप्ती केतकर सांगते, “मी याआधी कधीच अभिनय करताना कोल्हापुरी भाषेचा वापर केला नव्हता. कारण तसं पात्रच मी कधी साकारले नव्हते. पण 'हम तो तेरे आशिक हैं' मध्ये कावेरीची व्यक्तिरेखा साकारताना कोल्हापुरी बोलणं आवश्यक होतं आणि त्यासाठी मला सेटवरती आमचे दिग्दर्शक अजय मयेकर आणि माझे सहकलाकार प्रसाद ओक यांनी खूप मदत केली. मी पिंजरा आणि असे बरेच जुने चित्रपट सतत पाहिले. जेणेकरून मला काही उच्चार कळले आणि मला ती भाषा पिकअप करणं सोपं गेलं. सेटवरील एक असिस्टंट जो कोल्हापूरचा होता, त्याला मी माझा गुरु मानले आणि मी त्याला नेहमी म्हणायची की, माझे उच्चार चुकले तर माझ्या लक्षात आणून दे. आधी माझी बोली थोडी नागपुरी बोलीकडे वळत होती. पण माझ्या दिग्दर्शकांनी मला वेळीच सुधारलं. प्रसाद पण माझी यात खूप मदत करतो आणि आता मला कोल्हापुरी बोलीत बोलायची इतकी सवय झाली आहे की, मी स्वतःच डायलॉग्स इम्प्रोवाईज करते.”दीप्ती केतकरने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मला सासू हवी या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेने दिली. त्यानंतर तिने कमला या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. एका पेक्षा एक या कार्यक्रमात दीप्तीचा नृत्याविष्कार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. Also Read : खऱ्या आयुष्यात हम तो तेरे आशिक है फेम माधवी नेमकर आहे फिटनेस फ्रिक