जय मल्हार मालिका हिंदीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 09:30 AM2017-06-07T09:30:43+5:302017-06-07T15:00:43+5:30
जय मल्हार ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना ही मालिका, यातील व्यक्तिरेखा खूपच आवडत आहेत. या मालिकेतील व्यक्तिरेखांची वेशभूषा, रंगभूषा, ...
ज मल्हार ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना ही मालिका, यातील व्यक्तिरेखा खूपच आवडत आहेत. या मालिकेतील व्यक्तिरेखांची वेशभूषा, रंगभूषा, सेट याची देखील जोरदार चर्चा झाली होती. या मालिकेत देवदत्त नागे, सुरभी हांडे, इशा केसकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सगळ्याच कलाकारांना या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेने जवळजवळ तीन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपल्यामुळे या मालिकेच्या फॅन्सना चांगलेच दुःख झाले आहे. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. ही मालिका आता हिंदीत डब केली जाणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायावर आधारित ही मालिका होती. या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेचा विचार करता ही मालिका हिंदीत डब करण्याचा विचार केला जात आहे आणि या हिंदी व्हर्जनचे प्रसारण झी टिव्ही या वाहिनीवर होणार आहे. सध्या डबिंगची जोरदार तयारी सुरू असून डबिंग करण्यासाठी काही व्हॉईज आर्टिस्टची निवड करण्यात आली आहे,
कोणत्याही मराठी पौराणिक मालिकेचे हिंदीत डबिंग व्हायची ही पहिलीच वेळ आहे. जय मल्हारचे हिंदी रूप देखील प्रेक्षकांना आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे. आपली मालिका हिंदीत डब केली जात असल्याने या मालिकेचे निर्माते महेश कोठारे सध्या चांगलेच खूश आहेत.
जय मल्हार ही मालिका याआधी तामिळ भाषेतही डब करण्यात आली होती. तामिळ व्हर्जनलादेखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील हे काहीच दिवसांत कळेल.