Raju Srivastav Last Video : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव एक महिन्यांपेक्षा जास्त काळ दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये जीवनाशी दोन हात करत होते. अखेर 58 वयात त्यांचं निधन झालं. डॉक्टरांकडून प्रयत्न केला जात होता की, त्यांचा श्वास परत आणला जावा. पण ते होऊ शकलं नाही. मनोरंजन विश्वात त्याच्या जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला हार्ट अटॅक आला होता आणि त्याच्या एक दिवसआधी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता.
जर तुम्ही राजू श्रीवास्तव यांचं इन्स्टाग्राम पेज बघाल तर त्यांनी शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या एक दिवसआधी पोस्ट केली होती. कारण त्यांना 10 ऑगस्टला हार्ट अटॅक आला होता आणि नंतर एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये राजू श्रीवास्तव यांनी कोरोनापासून बचावासंबंधी बॉलिवूड कलाकारांची मिमिक्री केली होती. त्यांनी व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं होतं की, 'कोरोना कॉलर ट्यून याद है....
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी व्हिडीओत कोरोना सुरक्षेचा मेसेज अमिताभ बच्चन यांच्याऐवजी दिग्गज अभिनेता शशी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या आवाजात म्हटला. या व्हिडीओ त्यांनी फारच चांगली मिमिक्री केली. या व्हिडीओला 14 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले. दरम्यान 10 ऑगस्टला वर्कआउट दरम्यान राजू श्रीवास्तव हे बेशुद्ध झाले होते. ज्यानंतर त्यांना दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते हॉस्पिटलमध्ये 41 दिवस दाखल होते.
राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणं बंद केलं होतं आणि त्यांना सतत लाइफ सपोर्टवर ठेवलं जात होतं. काही दिवसांनी त्यांच्या हात-पायांमध्ये मुव्हमेंट दिसली होती. पण अखेर ते जीवनाची लढाई हरले. पण त्यांची कॉमेडी, त्यांचं काम लोकांच्या मनात नेहमीसाठी राहणार आहे.