Join us

बाबो..! झी मराठीवरील एक नाही तर तब्बल तीन मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:00 IST

लवकरच या मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहेत.

मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात छोट्या पडद्यावरील मालिकांचे शूटिंग थांबले होते. त्यावेळी मालिकांचे नवीन एपिसोड प्रसारीत करण्यासाठी नव्हते. अशावेळेला वाहिनीवर चित्रपट आणि जुन्या मालिका प्रसारीत केल्या जात होत्या. मात्र त्यानंतर आता बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. पण त्यातील आता काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.टीआरपीच्या स्पर्धेत मालिका टिकत नसल्यामुळे मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पहायला मिळाले. याच यादीत आता आणखी दोन मालिकांची भर पडण्याची शक्यता आहे.

सध्या चर्चेत असलेली मालिका देवमाणूस लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी आता नवीन मालिका दाखल होते आहे. या मालिकेचे नाव आहे ती परत आलीये. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे.

तसेच कारभारी लयभारी ही मालिका देखील आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.

चार महिन्यांपूर्वी 'अग्गंबाई सासूबाई'चे नवीन पर्व 'अग्गंबाई सूनबाई' मालिका दाखल झाली. पहिल्या पर्वात सासूच्या पाठीशी सून आणि आता दुसऱ्या पर्वात सूनेच्या पाठीशी सासू असे दाखवण्यात आले आहे. मात्र मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मालिका संपवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे म्हटले जात आहे. या महिन्याच्या अखेरीस मालिकेचे शूटिंग पूर्ण होईल. तर ऑगस्टमध्ये मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :झी मराठीअग्गंबाई सूनबाईअग्गंबाई सासूबाई