मेलबर्न : जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली आहे. नाओमी ओसाका हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवा हिचा पराभव केला.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाओमी ओसाकाने पेत्रा क्वितोवा हिचा 7-6(2) 5-7 6-4 असा पराभव केला. नाओमी ओसाकाने पटकाविलेले हे सलग दुसरे गँड स्लॅम विजेतेपद आहे.
नाओमी ओसाका आणि पेत्रा क्वितोवा यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. या दोघींनी पहिल्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता.
चौथ्या मानांकित नाओमी ओसाकाने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सातव्या मानांकित कॅरोलीना प्लिसकोवावर मात केली होती. तिने 6-2, 4-6, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला होता.
दरम्यान, नाओमी ओसाका हिने यापूर्वी 2018 मध्ये अमेरिकन ओपन टेनिस सर्धेच्या अंतिम फेरीत पल्ला गाठला होता.