डेव्हिस कप चषक : भारताला नमवत इटली अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:05 AM2019-02-03T06:05:43+5:302019-02-03T06:06:13+5:30

भारताने दुहेरीत आपल्या ख्यातीनुसार प्रदर्शन केले. मात्र इटलीने एकेरीत विजय मिळवत यजमान भारताला ३-१ ने पराभूत करत डेव्हिस कप विश्व फायनल्समध्ये प्रवेश केला.

Davis Cup trophy: Italy knocked down Italy in the final round | डेव्हिस कप चषक : भारताला नमवत इटली अंतिम फेरीत

डेव्हिस कप चषक : भारताला नमवत इटली अंतिम फेरीत

Next

कोलकाता : भारताने दुहेरीत आपल्या ख्यातीनुसार प्रदर्शन केले. मात्र इटलीने एकेरीत विजय मिळवत यजमान भारताला ३-१ ने पराभूत करत डेव्हिस कप विश्व फायनल्समध्ये प्रवेश केला. आंद्रियास सेप्पी याने भारताच्या नंबर वन खेळाडू प्रज्नेश गुणेश्वरन याला पहिल्या उलट एकेरी सामन्यात ६-१, ६-४ अशी मात दिली. त्यानंतर भारताने पहिला दुहेरी सामना जिंकत इटलीला व्हाईटवॉश मिळवण्याच्या आशांवर
पाणी फेरले.

इटलीने काल २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, सिमोल बोलेली आणि मातेओ बेरेतिनी यांना दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि
द्विज शरण यांनी पराभूत केले. बोपन्ना आणि शरण यांनी अपेक्षांवर खरे उतरत एक सेटने मागे पडल्यावरदेखील पुनरागमन केले आणि एक तास ४३ मिनिटे चाललेल्या सामन्यात ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. बोपन्ना आणि शरण यांनी दुसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये
बेरेतिनिची सर्व्हिस तोडत पुनरागमन केले. २०१२ नंतर पुनरागमन करणाºया शरण याने बोपन्नाची पूर्ण साथ देत फोरहॅण्डवर विनर लगावत विजय मिळवून दिला.
३४ वर्षांच्या सेप्पीवर दुहेरीतील सामन्याचा कोणताही फरक जाणवला नाही. त्याने ६२ मिनिटांतच १०२ वे रँकिंग असलेल्या गुणेश्वरनवर मात केली आणि संघाला नोव्हेंबरमध्ये माद्रिदमध्ये होणा-या फायनल्समध्ये पोहोचवले.
सेप्पी सामन्यानंतर म्हणाला की, ‘हा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. निश्चितपणे कडव्या दुहेरीनंतर मला अंतिम निर्णायक एकेरी लढत खेळायची होती आणि मजबुतीने खेळलो.’ प्रज्नेशकडे एटीपी रँकिंगमध्ये ३७व्या स्थानावर असलेल्या सेप्पीविरोधात पहिला सेट जिंकण्याची एकही संधी नव्हती. त्याने दुसºया सेटमध्ये चांगला खेळ केला. मात्र, ४० चुकांमुळे त्याच्या आशा संपल्या. भारताने एशिया ओसनिया ग्रुप एकमध्ये चीनला पराभूत करत विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये प्रवेश केला होता. इटलीने या विजयासोबतच भारताविरोधातील आपली विजयाची कामगिरी ५-१ अशी केली आहे. दुहेरीतील विजयानंतर शरण यांनी सांगितले की, ‘भारताकडून खेळण्याचा
दबाव होता. मात्र, रोहन सोबत असल्याने जाणवला नाही.’

आम्हाला पूर्ण विश्वास होता. मात्र, आम्ही काल एक गुण तरी मिळवायला हवा होता. ०-२ ने मागे पडल्यावर जिंकणे कठीण असते.
निश्चितपणे आम्हाला माद्रिदला जायचे होते. माद्रिदमध्ये खेळणाºया १२ संघांतील किती खेळाडू रँकिंगमध्ये अव्वल १०० च्या बाहेर
आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- महेश भूपती,
डेव्हिस कप कर्णधार

Web Title: Davis Cup trophy: Italy knocked down Italy in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस