जोकोवीचचा दुसऱ्याच फेरीत पराभव, फ्रान्सच्या पेयरेचा सरळ विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:23 AM2018-03-25T05:23:44+5:302018-03-25T05:23:44+5:30
आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत केवळ तासाभरात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या बेनॉईट पेयरेने त्याचे आव्हान ६-३, ६-४ असे संपवले.
मियामी (अमेरिका) : आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत केवळ तासाभरात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या बेनॉईट पेयरेने त्याचे आव्हान ६-३, ६-४ असे संपवले. यासह जोकोवीच हा अद्याप दुखापतीतून सावरलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा माजी नंबर वन खेळाडू २००७ नंतर प्रथमच सलग तीन सामने हरला आहे. जोकोवीचने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली असली तरी शुक्रवारी पेयरेविरुद्ध ६७ मिनिटांच्या लढतीत त्याची काही एक मात्रा चालली नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून जोकोवीच कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो तसा मैदानाबाहेरच आहे. २०१७ च्या विम्बल्डननंतर तो केवळ तीन स्पर्धा खेळला आहे मात्र या तीन्ही स्पर्धात तो अपयशी ठरला.
जोकोवीचला नमविणाºया पेयरेचा पुढचा सामना आता फिलीप क्राजीनोवीकशी आहे. फिलीपने लियाम ब्रॉडीवर ६-३, ६-२ असा विजय मिळवला.
वोझ्नियाकी मियामी ओपनच्या बाहेर
आॅस्ट्रेलियन ओपनची विजेती कॅरोलिन वोज्नियाकी हिला डब्ल्यूटीए मियामी ओपनच्या दुसºया फेरीत मोनिका पुईगकडून ६-०,४-६,४-६ असा पराभव पत्करावा लागला. जगातील दुसºया क्रमांकाची खेळाडू वोज्नियाकी हिने पहिला सेट सहजपणे जिंकला. मात्र त्यानंतर ती आपली लय कायम राखू शकली नाही. पुईग हिने दुसºया मॅच पॉर्इंटवर फोरहॅण्डला विनर लगावत विजय मिळवला.
व्हिनस विल्यम्स तिसºया फेरीत
सात वेळची ग्रॅण्डस्लॅम विजेती खेळाडू व्हिनस विल्यम्स हिने क्वालिफायर नताली विखलियांत्सेवा हिला ७-५, ६-४ असे पराभूत करत डब्लुटीए मियामी ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या ३७ वर्षांच्या व्हिनस हिने पहिल्या सेट मध्ये रशियन खेळाडू नतालीविरोधात २-५ अशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने सलग पाच गुण घेत सेट पटकावला. दुसºया सेटमध्येही नतालीने ३ -० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर व्हिनस हिने ६-४ असा सेट जिंकला आणि विजय मिळवला. आता तिचा सामना २९ वी मानांकित नेदरलॅण्डची खेळाडू किकि बर्टेस हिच्यासोबत होईल. तिने अमेरिकेच्या वारावरा लेपचेंकोला ५-७,७-६,६-१ असे पराभूत केले.