दिवाळखोरीमुळे एकेकाळच्या अव्वल टेनिसपटूने काढले आपल्याकडील विम्बल्डन चषक विक्रीस  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 09:45 PM2017-10-05T21:45:09+5:302017-10-05T21:45:31+5:30

दिवाळखोर ठरलेला माजी टेनिसपटू बोरिस बेकरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. त्यातच त्याच्यावर 44दशलक्ष फ्रँक एवढे प्रचंड कर्ज झाले आहे. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी बेकरने आपल्याकडील मौल्यवान वस्तू विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

Due to bankruptcy, one of the top-ranked tennis players removed their Wimbledon Cup sales | दिवाळखोरीमुळे एकेकाळच्या अव्वल टेनिसपटूने काढले आपल्याकडील विम्बल्डन चषक विक्रीस  

दिवाळखोरीमुळे एकेकाळच्या अव्वल टेनिसपटूने काढले आपल्याकडील विम्बल्डन चषक विक्रीस  

Next

पॅरिस - दिवाळखोर ठरलेला माजी टेनिसपटू बोरिस बेकरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. त्यातच त्याच्यावर 44दशलक्ष फ्रँक एवढे प्रचंड कर्ज झाले आहे. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी बेकरने आपल्याकडील मौल्यवान वस्तू विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. 
बोरिस बेकरने विम्बल्डनचे विजेतेपद पटकावल्यावर टेनिसच्या जगतात त्याच्या नावाचा खूप बोलबाला झाला होता. मात्र बेकरने आता तेच विम्बल्डन विजेतेपदाचे चषक विक्रीस काढले आहेत.  त्याबरोबरच आपल्याकडील चार मौल्यवान घड्याळांचा लिलाव करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. यामधून आपल्यावरील आर्थिक ओझे काहीसे हलके होईल, अशी त्याला अपेक्षा आहे. 
महिन्याभरापूर्वीच बोरिस बेकर दिवाळखोर घोषित झाला होता. तसेच 31 मिलियन फ्रँकची मागणी करत त्याच्या माजी व्यावसायिक भागीदाराने न्यायालयात धाव घेतली होती. वाढत चाललेल्या आर्थिक संकटाचा विचार करून या विजेतेपदांशी जोडल्या गेलेल्या भावना बाजूला ठेवून बेकरने हे करंडक विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही विक्री लवकरात होऊन पैसे हातात यावेत अशी बेकरची इच्छा असल्याचे त्याच्या निकटवर्तीयाने सांगितले. 
 

Web Title: Due to bankruptcy, one of the top-ranked tennis players removed their Wimbledon Cup sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा