प्राग : टेनिसविश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या आठवड्यात २२ सप्टेंबरपासून प्राग येथे होणाºया लावेर कप टेनिस स्पर्धेत एकाच संघातून खेळताना दिसतील. लावेर कप स्पर्धेत फेड - राफा ही सुपरहीट जोडी युरोप संघाकडून खेळताना दिसेल. या जेतेपदासाठी युरोप संघ विरुद्ध विश्व संघ असा रोमांचक सामना रंगेल.यंदाच्या वर्षी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेवर फेडरर व नदाल यांचे वर्चस्व राहिले आहे. फेडररने आॅस्टेÑलियन आणि विम्बल्डन स्पर्धा, तर नदालने फ्रेंच आणि अमेरिकन ओपन जेतेपद पटकावून दिमाखात पुनरागमन केले. त्यामुळेच, टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.विशेष म्हणजे सुमारे दोन दशक एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून टेनिसविश्व गाजवलेले फेडरर - नदाल पहिल्यांदाच एकाच संघातून खेळतील. युरोपियन संघात फेडरर - नदाल व्यतिरिक्त जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असलेले मारिन सिलिच, अॅलेक्झांडर ज्वेरेव, डॉमनिक थिएम व माजी अव्वल खेळाडू थॉमस बर्डिच यांचा समावेश आहे.दुसरीकडे, दिग्गज जॉन मॅकेन्रो याच्या नेतृत्त्वाखालील विश्व संघात फ्रान्सिस तियाफो, सॅम क्वेरी, जॉन इनसर आणि जॅक सोक या चार अमेरिकनसह आॅस्टेÑलियाचा निक किर्गियोस आणि कॅनडाचा युवा डेनिस शापोवालाव यांचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)>राफासह खेळण्यास मला नक्कीच आवडेल. आमच्या एकत्रित खेळण्याने प्रतिस्पर्धी संघाला किती नुकसान होईल, हे पाहू इच्छितो. प्रेक्षकांना हा सामना पाहणे नक्कीच आवडेल याचा मला ठाम विश्वास आहे. कारण टेनिससाठी हा शानदार दिवस असेल.- रॉजर फेडरर
फेडरर, नदाल एकाच संघातून खेळणार, लावेर कप; युरोप वि. विश्व रोमांचक सामना रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:23 AM