फ्रेंच ओपन : मुगुरुजा, मारिया पुढच्या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 02:47 AM2018-06-01T02:47:06+5:302018-06-01T02:47:06+5:30
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गर्बाईन मुगुरुजा, वर्ल्ड नंबर वन सिमोना हालेप, मारिया शारापोवा यांनी
पॅरिस : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गर्बाईन मुगुरुजा, वर्ल्ड नंबर वन सिमोना हालेप, मारिया शारापोवा यांनी आपापले सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. तर, पुरुषांच्या गटात मारिन सिलीच याने ह्युर्बट हुरकोजवर विजय मिळवून तिसरी फेरी गाठली.
जागतिक रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेला मारिन सिलीच याला १८८व्या क्रमांकावर असलेला ह्युर्बट हुरकोज याने चांगलेच झुंजवले. सिलीच याने ६-२, ६-२, ६-७(३-७), ७-५ असा विजय मिळविला. पहिल्या आणि दुसºया सेटमध्ये सोपा विजय मिळविल्यानंतर सिलीचची लय बिघडली. तिसºया सेटमध्ये हुरकोजने त्याच्यावर विजय मिळविला. २ तास ५० मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिलीचला चांगलेच झुंजावे लागले. चौथ्या सेटमध्येदेखील हुरकोजने सिलीचला हैराण केले. मात्र, अखेरीस त्याने ७-५ असा विजय मिळवून सामना जिंकला. सिलीचला पुढच्या फेरीत अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनविरोधात खेळावे लागेल.
महिला एकेरीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिने जागतिक रँकिंगमध्ये ७२व्या स्थानावर असलेली अमेरिकेची टेलर टाऊनसेंड हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळविला. या विजयासाठी सिमोनाला फारसे परिश्रम घ्यावे लागले नाहीत. तिने ६-३, ६-१ असा विजय मिळवून लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. तिसºया फेरीत तिचा सामना १०७वे रँकिंग असलेल्या जर्मनीच्या अँड्रिया पेटकोव्हिकवर विजय मिळवला.
जागतिक रँकिंगमध्ये तिसºया स्थानावर असलेल्या गर्बाईन मुगुरुजाने फ्रान्सच्या फियोना फेरो हिचा ६-४, ६-३ असा पराभव केला. २५७वे रँकिंग असलेली फियोना स्पेनची अव्वल खेळाडू मुगुरुजा हिचा सामना करू शकली नाही. मुगुरुजाची गाठ तिसºया फेरीत अमेरिकेच्या समंथा स्टोसूर हिच्याशी पडेल.
रशियाच्या मारिया शारापोवाला मात्र विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. ३०वे रँकिंग असलेल्या या खेळाडूला क्रोएशियाच्या ५०वे रँकिंग असलेल्या डोन्ना वेकीकने चांगलेच हैराण केले. मारियाने डोन्नावर ७-५, ६-४ असा विजय मिळविला.
मारिया शारापोवा हिचा
पुढचा सामना चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिच्यासोबत होईल.
डॉमनिक थिएमचा विजय
दुसºया फेरीत डॉमनिक थिएमने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासवर विजय मिळविला. फ्रेंच ओपनच्या या लढतीत अनुभवी थिएमने १९ वर्षांच्या स्टेफानोसवर ६-२,२-६,६-४,६-४ असा विजय मिळविला. या सत्रात थिएमने स्टेफानोसवर हार्डकोटवर झालेल्या दोन सामन्यांत विजय मिळविला होता. तर, स्टेफानोसने थिएमला बार्सिलोनात क्ले कोर्टवर पराभूत केले होते.