पॅरिस : माजी चॅम्पियन गारबाईन मुगुरुजाने आॅस्ट्रेलियाच्या सॅम स्टोसूरचा ६-०, ६-२ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. मारिया शारापोव्हाने परंपरागत प्रतिस्पर्धी सेरेना विल्यम्सविरुद्ध लढत देण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.तिसरे मानांकनप्राप्त स्पेनच्या मुगुुरुजाने १५ विनर लगावले आणि पहिला सेट केवळ २५ मिनिटांमध्ये जिंकला. आता पुढच्या फेरीत तिला युक्रेनच्या लेसिया सुरेंकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सुरेंकोने १९ व्या मानांकित स्लोव्हाकियाच्या मगडालेना राइबारिकोव्हाचा ६-२, ६-४ ने पराभव केला. परंपरागत प्रतिस्पर्धी सेरेना व शारापोव्हा यांच्यादरम्यान उपउपांत्यपूर्व फेरीत लढत होऊ शकते. शारापोव्हाने सहावे मानांकन प्राप्त कॅरोलिना प्लिसकोव्हाचा ६-२, ६-१ ने पराभव केला. डोपिंग प्रकरणात निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेल्यानंतर शारापोव्हाने या लढतीत आपला जुना फॉर्म दाखविला. दोनदा जेतेपद मिळवणाऱ्या शारापोव्हाला बंदी असलेल्या औषधाचे सेवन केल्याच्या आरोपामुळे दोन वर्षांपूर्वी निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यानंतर तिला प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत मानांकन मिळाले आहे. एस्तोनियाच्या जर्गेन जोपची लढत जर्मनीच्या मॅक्सीमिलन मार्टररसोबत होईल. महिला विभागात दोनदा उपविजेती ठरलेली हालेपला तिसºया फेरीत जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोविचसोबत खेळायचे आहे.बोपन्ना - रॉजर व्हॅसेलीन उपांत्यपूर्व फेरीतरोहन बोपन्ना आणि त्याचा फ्रेंच जोडीदार एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात अग्रमानांकित मार्सेलो मेलो आणि लुकाज कुबोट यांना सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.बोपन्ना आणि रॉजर व्हॅसेलीन या १३ व्या मानांकित जोडीने मार्सेलो मेलो आणि लुकाज कुबोट याना ६-४,६-७ असे पराभूत केले. बोपन्ना याने फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसºयांदा प्रवेश केला आहे. त्याने याआधी २०११ आणि २०१६ मध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
फ्रेंच ओपन : मुगुरुजा, शारापोव्हाची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 3:01 AM