पॅरिस : पाचवे मानांकन प्राप्त व विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन जर्मनीच्या एंजलिक कर्बरचे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. रविवारी तिचा रशियाच्या युवा अनास्तासिया पोटापोव्हाविरुद्ध धक्कादायक पराभव झाला. १८ वर्षीय पोटापोव्हाने आपल्या फ्रेंच ओपनच्या पदार्पणात कर्बरचा ६-४, ६-२ ने पराभव करीत खळबळ माजवली. कर्बर फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत सहाव्यांदा पराभूत झाली. स्पेनच्या गार्बाईन मुगुरुजाने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडचा ५-७, ६-२, ६-२ असा पराभव केला. क्रोएशियाच्या ३१ व्या मानांकित पेत्रा मार्टिच २०१९ च्या स्पर्धेत विजय मिळवणारी पहिला खेळाडू ठरली. तिने ट्युनिशियाच्या ओंस जबोरचा६-१, ६-२ ने पराभव केला.पुरुषांमध्ये दिग्गज रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. त्याने एक तास ४१ मिनिटे रंगलेल्या सामन्यात इटलीच्या लोरेंजो सोनेगो याला ६-२, ६-४, ६-४ असे नमविले.
फ्रेंच ओपन टेनिस : कर्बरचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:30 AM