फ्रेंच ओपन : व्हिनस पहिल्याच फेरीत गारद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:27 AM2018-05-28T02:27:41+5:302018-05-28T02:27:41+5:30
अमेरीकेची स्टार टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक रँकिंगमध्ये ९१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनची खेळाडू कियांग वँग हिने ६-४,७-५ असे पराभूत केले.
पॅरिस - अमेरीकेची स्टार टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक रँकिंगमध्ये ९१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनची खेळाडू कियांग वँग हिने ६-४,७-५ असे पराभूत केले.
सात वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती व्हिनस मागच्या सहा फ्रेंच ओपन स्पर्धांमध्ये खेळताना तिला तिसऱ्यांदा पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडता आलेला नाही. क्ले कोर्टवर आपली २१ वी स्पर्धा खेळणाºया व्हिनसवर चीनच्या वँग हीने १०० मिनीटे चाललेल्या सामन्यात वर्चस्व गाजवले. सुमारे वर्षभरापुर्वी व्हिनस विल्यम्स हिला असाच पराभव पत्करावा लागला होता. तसेच तिला या वर्षी झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत देखील पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. चौथे मानांकनप्राप्त बुल्गारियाचा ग्रिगोर दिमित्रोव्हने मिस्रचा ‘लकी लुजर’ मोहम्मद सफवतचा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. दिमित्रोव्हने या एकतर्फी सामन्यात ६-१, ६-४, ७-६ ने सरशी साधली. पॅरिसमध्ये यापूर्वी कधीच तिसºया फेरीच्या पुढे मजल मारण्यात अपयशी ठरलेल्या दिमित्रोव्हला पहिल्या फेरीत अनुभवी
व्हिक्टर ट्राईकीविरुद्ध खेळायचे होते, पण कोर्टवर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी ट्राईकीने
पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक क्रमवारीत १८२ व्या स्थानावर असलेल्या सफवतला ग्रॅण्डस्लॅम पदार्पणाची संधी मिळाली. सफवत १९९६ मध्ये अमेरिकन ओपनममध्ये तामेर अल सावीनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मुख्य फेरीत खेळणारा मिस्रचा पहिला टेनिसपटू ठरला. दिमित्रोव्हला अंतिम ३२ खेळाडूंत स्थान मिळवण्यासाठी अमेरिकेचा जयर्ड डोनाल्डसन व चिलीचा निकोलस जेरी यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
गतविजेती ओस्टापेनको पहिल्या फेरीत पराभूत
गतविजेती येलेना ओस्टापेनको हिला पहिल्याच फेरीतपराभव पत्करावा लागला. युक्रेनच्या कॅथरीना कोज्लोवा हीने गतविजेत्या ओस्टापेनको हिचे आव्हान ७-५, ६-३ असे सरळ सेटमध्ये संपवले. रविवारी १ तास पाच मिनिटे झालेल्या या सामन्यात ६६ वे
रँकिंग असलेल्याकॅथरीना हिने पहिल्या सेटमध्ये संघर्ष करत तर दुसºया सेटमध्ये ३-२ अशा पिछाडीवरून कोज्लोवा हिने
६-३ असा विजय मिळवला.