पॅरिस : भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरी रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत चिनी ताइपेच्या येन सुन लूच्या आव्हानाला सामोरे जाईल. पहिल्या फेरीचा अडथळा पार केला तर पुढच्या फेरीत त्याची गाठ १४ वे मानांकन प्राप्त जॅक सॉकसोबत पडू शकते.वर्षातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी शुक्रवारी ड्रॉ काढण्यात आले. त्यात भांबरीला अव्वल हाफमध्ये स्थान मिळाले. त्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आणि १० वेळा जेतेपदाचा मान मिळवणाºया राफेल नदालचा समावेश आहे.जागतिक क्रमवारीत ९४ व्या स्थानावर असलेला भांबरी व ११३ व्या क्रमांकावरील सुन लू यांच्यादरम्यान यापूर्वी केवळ चॅलेंजर पातळीवर दोनदा लढती झाल्या आहेत. या दोन्ही लढतींमध्ये चिनी ताइपेच्या खेळाडूने सरशी साधली होती, पण यांच्यादरम्यान अखेरची लढत २०१३ मध्ये खेळल्या गेली होती.दुसरीकडे, प्रजनेश गुणेश्वरनचा प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्याचे स्वप्न स्वीडनच्या एलियास येमरविरुद्ध ३-६, ४-६ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे धुळीस मिळाले. फ्रेंच ओपन क्वालिफायरमध्ये अखेरच्या फेरीतील ही लढत १ तास २७ मिनिट रंगली.गुणेश्वरनला पहिल्या सेटमध्ये ब्रेक पॉर्इंटच्या पाच संधी मिळाल्या, पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. दरम्यान, त्याने एकदा सर्व्हिसही गमावली. येमरला दुसºया सेटमध्ये भारतीय खेळाडूची सर्व्हिस भेदण्याच्या तीन संधी मिळाल्या त्यात तो दोनदा यशस्वी ठरला. दुसºया बाजूचा विचार करता गुणेश्वरला चारवेळा अशी संधी मिळाली, पण तो केवळ एकदाच यशस्वी ठरला. (वृत्तसंस्था)
वाइल्ड कार्ड प्रवेशसेरेना आणि व्हिनस या विलियम्स भगिनींना फ्रेंच ओपन महिला दुहेरी गटासाठी वाइल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. विलियम्स भगिनींचा यंदा तिसºयांदा फ्रेंच ओपन पटकावण्याचा निर्धार असेल. याआधी सेरेना - व्हिनस यांनी १९९९ आणि २०१० मध्ये जेतेपद पटकावले होते.दोघींनी आतापर्यंत एकूण १४ दुहेरी ग्रँडस्लॅम पटकावले असून २०१० साली जेतेपद पटकावल्यानंतर विलियम्स भगिनी केवळ २०१३ आणि २०१६ मध्येच फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी झाले.