फ्रेंच ओपन : झ्वेरेव, निशीकोरी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:11 AM2018-06-02T04:11:04+5:302018-06-02T04:11:04+5:30
जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात मॅच पॉईंट वाचवल्यानंतर बोस्नियाच्या
पॅरिस : जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात मॅच पॉईंट वाचवल्यानंतर बोस्नियाच्या दामिर जुमहूरला हरवत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत युके्रनच्या चौथ्या मानांकित एलिना स्वितलोना हिला पराभवाचा सामना करावा लागला. तर जपानच्या केई निशीकोरी यानेही सहज विजय मिळवला.
२१ वर्षांच्या झ्वेरेव याने पिछाडीनंतर पुनरागमन करताना जुमहूर याला चार तास चाललेल्या सामन्यात ६-२,३-६,४-६,७-६(७-३),७-५ असे पराभूत केले. जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू स्पेनच्या राफेल नदाल याच्या ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपदाच्या मार्गात सर्वात कडवा प्रतिस्पर्धी म्हणून झ्वेरेवकडे पाहिले जात आहे. मात्र आजच्या सामन्यात तो लयीत दिसला नाही. त्याने ७३ सहज चुका केल्या. त्यासोबतच सात डबल्स फॉल्टदेखील केले. आठ वेळा सर्व्हिस गमावली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये मॅटपॉईंट वाचवत जुमहूरची सर्व्हिस तोडली आणि विजय मिळवला. त्याने पहिल्यांदाच अंतिम १६ मध्ये जागा मिळवली आहे.
जपानचा केई निशीकोरीदेखील पुढच्या फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. त्याने फ्रान्सच्या जाईल्स सिमोनला सरळ सेटमध्ये ६-३,६-१,६-३ असे पराभूत केले. चौथ्या मानांकित बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमीत्रोवला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला फर्नांडो वर्दास्को याने सरळसेटमध्ये पराभूत केले. स्पेनच्या अनुभवी वर्दास्को याने ७-६,६-२,६-४ असा विजय मिळवला. त्याचा पुढचा सामना नोवाक जोकोविच विरोधात होणार आहे. जोकोविच याने स्पेनच्या रॉर्बटो बतिस्ता आगुट याच्यावर ६-४,६-७(६-८), ७-६(७-४), ६-२ असा विजय मिळवला. महिला एकेरीत स्वितलोना हिला ३१ व्या मानांकित रोमानियाच्या मिहाईला बुजारनेस्कु विरोधात पराभवाचा सामना करावा लागला. मिहाईला हिने एलिनावर ६-३,७-५ असा विजय मिळवला. मिहाईलाचा पुढचा सामना अमेरिकेच्या तिसºया मानांकित मेडिसन किज हिच्यासोबत होतील. तिने जपानच्या २१ व्या मानांकित नाओमी ओसाका हिच्यावर सरळ सेटमध्ये ६-१, ७-६ असा सोपा विजय मिळवला. तर कजाकिस्तानच्या युलिया पुतिनत्सेवाने पहिला सेट गमावल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत चीनच्या कियांग वँग हिला १-६, ७-५, ६-४ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)
युकी भांबरी, शरण पराभूत
पुरुष दुहेरीच्या दुसºया फेरीत भारताच्या युकी भांबरी आणि द्विज शरण पराभूत धाले आहेत. आॅस्ट्रियाच्या आॅलिव्हर माराह आणि क्रोएशियाच्या मॅट पॅव्हिक या जोडीने भारतीय जोडीवर ७-५,६-३ असा विजय मिळवला.
फ्रेंच ओपन टेनिसच्या मिश्र दुहेरीत गतविजेत्या रोहन बोपन्नाला यंदा पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. टिमीया बाबोस हिच्या साथीने खेळणाºया बोपन्नाला चीनच्या शुई झान्स आणि आॅस्ट्रेलियाच्या जॉन पेर्स यांनी २-६,३-६ असे पराभूत केले.
पुरुष दुहेरीत बोपन्नाचे आव्हान अजून कायम आहे. कॅटरिना स्त्रेवोनिक आणि सॅन्टियागो गोन्सालेक यांनी भारताचा द्विज शरण आणि त्याची जपानची साथीदार शुको ओयामा यांना २-६,६-३,१-०(१०-५) असे पराभूत केले.