शापोवालोव्हमुळे कॅनडा पुन्हा विश्व गटात, भारत ३-२ ने पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:42 AM2017-09-19T03:42:23+5:302017-09-19T03:42:25+5:30

रामकुमार रामनाथनला ‘करा अथवा मरा’ लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताला पुन्हा एकदा आशियाई विभागात आव्हान सादर करावे लागेल.

India again lost 3-2 in the World Group, due to Shapovalov | शापोवालोव्हमुळे कॅनडा पुन्हा विश्व गटात, भारत ३-२ ने पराभूत

शापोवालोव्हमुळे कॅनडा पुन्हा विश्व गटात, भारत ३-२ ने पराभूत

Next

एडमंटन : रामकुमार रामनाथनला ‘करा अथवा मरा’ लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताला पुन्हा एकदा आशियाई विभागात आव्हान सादर करावे लागेल. डेनिस शापोवालोव्हच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कॅनडाने भारताचा ३-२ ने पराभव केला आणि डेव्हिस कप विश्व गट टेनिस स्पर्धेत पुन्हा स्थान मिळवले.
भारताला अखेरच्या दिवशी रामकुमारकडून चमत्काराची आशा होती; पण त्याला संधीचा लाभ घेता आला नाही. जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानावर असलेल्या शापोवालोव्हने ६-३, ७-६, ६-३ ने सरशी साधत कॅनडाला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
युकीने त्यानंतर स्पर्धेची औपचारिकता पूर्ण करणाºया पाचव्या सामन्यात ब्रायडन शनूरचा ६-४, ४-६, ६-४ने पराभव केला. या निकालानंतरही इंडोर कोर्टमध्ये खेळल्या गेलेल्या विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत भारताला २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. भारत सलग चौथ्या वर्षी प्ले आॅफचा अडथळा पार करण्यात अपयशी ठरला. गेल्या तीन प्रयत्नात भारताला सर्बिया, चेक प्रजासत्ताक व स्पेन यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 
>आम्हाला संधीचा लाभ घेता आला नाही. आम्ही सर्वंच सामन्यांत संधी गमावली. सोमवारी दुस-या सेटमध्ये बरोबरी साधण्यासाठी रामकुमारकडे चार सेट पॉइंट््स होते. आम्ही कडवी झुंज दिली आणि आम्हाला विश्व गटात स्थान मिळवण्याची चांगली संधी होती. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत युकी व रामकुमार दोघेही अव्वल १०० मध्ये स्थान मिळवतील, अशी मला आशा आहे.
- महेश भूपती

Web Title: India again lost 3-2 in the World Group, due to Shapovalov

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.