माद्रिद ओपन टेनिस : राफेल नदालची विजयी आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 04:02 AM2019-05-10T04:02:18+5:302019-05-10T04:02:34+5:30
‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली.
माद्रिद - ‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. त्याने कॅनडाचा युवा टेनिसपटू फेलिक्स आॅगर एलियासिमे याचा पराभव केला. त्याचवेळी, नदालचाच देशबांधव डेव्हिड फेरर याने पराभवानंतर निवृत्ती घेतली.
नदालने फेलिक्सविरुद्ध ६-३, ६-३ असा धडाकेबाज विजय मिळवत दिमाखात सुरुवात केली आहे. पुढील फेरीत नदाल अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोविरुद्ध लढेल.
दुसरीकडे, जागतिक टेनिसमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या डेव्हिड फेररने पराभवाचा सामना केल्यानंतर टेनिसविश्वातून निवृत्ती घेतली. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने एकतर्फी सामन्यात वर्चस्व राखताना फेररचा ६-४, ६-१ असा पराभव केला. सामना संपल्यानंतर फेररने पत्नी मार्टा टॉर्नेल आणि मुलाच्या उपस्थितीमध्ये प्रेक्षकांना अभिवादन केले. या भावनिक क्षणी फेररला अश्रू अनावर झाले. तसेच नदाल, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दिग्गजांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंनी फेररला मानवंदनाही दिली.
स्पर्धेच्या तिसºया फेरीत स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका आणि जपानचा केई निशिकोरी यांच्यातील लढतीकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे. निशिकोरीने बोलिवियाच्या हुगो डेलिन याचा ७-५, ७-५ असा पाडाव केला. दुसरीकडे, वावरिंकाने अर्जेंटिनाच्या गुईडो पेला याचा ६-३, ६-४ असा धुव्वा
उडवला. (वृत्तसंस्था)
या स्पर्धेत सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने खेळत असलेल्या नदालला गेल्या महिन्यात माँटे कार्लो आणि बार्सिलोना ओपन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर तो
काहीवेळ पोटाच्या
आजाराने त्रस्त झाला.