ललित झांबरे
यंदा भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत सर्वप्रथम आपले स्थान निश्चित केले. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेववरील सरळ विजयासह त्याने ही आगेकूच केली आणि त्यादरम्यान एक अनोखा विक्रम नोंदवला.
टेनिसच्या जागतिक क्रमवारीत सध्या टॉप टेनमध्ये असलेल्या सर्व खेळाडूंवर आता त्याच्याकडे विजयी आघाडी आहे. यासह आपण खऱ्याअर्थाने नंबर वन असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.
उदाहरणार्थ - झ्वेरेवविरुध्दच्या तीन लढतीत आता जोकोवीच दोन विजय आणि एक पराभव असा आघाडीवर आहे.
जोकोची ही विक्रमी कामगिरी पुढीलप्रमाणे-
क्रम खेळाडू जोकोचे विजय-पराभव
२ राफेल नदाल २७-२५३ रॉजर फेडरर २५-२२४ युआन डेल पौत्रो १५- ०४५ अलेक्झांडर झ्वेरेव ०२-०१६ केव्हिन अँडरसन ०७-०१७ मारिन सिलिक १६-०२८ डॉमिनिक थीएम ०५-०२९ केई निशीकोरी १५-०२१० जॉन इस्नर ०९-०२