टोकियो - जागतिक टेनिसमधील माजी अव्वल खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोवाने नवी टेनिस सम्राज्ञी अमेरिकेन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका हिला सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का देत टोकियो पॅन पॅसिफिक ओपनचे जेतेपद पटकविले. चौथी मानांकित प्लिस्कोवाने ओसाकावर ६-४, ६-४ ने विजय नोंदविला. या पराभवामुळे ओसाकाची सलग १० विजयाची मालिका खंडित झाली. झेक प्रजासत्ताकची प्लिस्कोवा विजयानंतर म्हणाली, ‘हा सामना तीन सेटपर्यंत चालला नाही, याबद्दल आनंदी आहे. माझी सर्व्हिस सर्वात मोठे शस्त्र आहे. आज या बळावर विजय मिळवू शकले.’ प्लिस्कोवाचे करियरमधील हे ११ वे जेतेपद आहे. (वृत्तसंस्था)
प्लिस्कोवाचा यूएस चॅम्पियन ओसाकाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:15 AM