रामकुमार विजयी, युकीची माघार, कोलंबस चँलेंजर टेनिस; दुस-या फेरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:16 AM2017-09-22T04:16:54+5:302017-09-22T04:16:56+5:30
रामकुमार रामनाथन याने अमेरिकेच्या सेकोऊ बेंगोरा याला नमवताना कोलंबस चॅलेंजर टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली; परंतु युकी भांबरी याने पहिल्या लढतीदरम्यानच माघार घेतली.
नवी दिल्ली : रामकुमार रामनाथन याने अमेरिकेच्या सेकोऊ बेंगोरा याला नमवताना कोलंबस चॅलेंजर टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली; परंतु युकी भांबरी याने पहिल्या लढतीदरम्यानच माघार घेतली. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. द्वितीय मानांकित रामकुमारने अमेरिकन प्रतिस्पर्ध्यास पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत दोन तास आणि ६ मिनिटांत ७-६, ६-४ असे पराभूत केले. दुखापतीमुळे
युर्की जोस फर्नांडिजविरुद्ध पहिल्या फेरीचा सामना पूर्ण करू शकला नाही आणि २ तास १६ मिनिटांत त्याला ६-४, ६-७, ०-२ असा पराभव पत्करावा लागला.
रामकुमार याचे या ७५००० डॉलर बक्षीस रकमेच्या एकेरीत एकमेव आव्हान कायम आहे. त्याआधी प्रजनेश गुणेश्वरनला पहिल्या
फेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. (वृत्तसंस्था)
>पेस-राजा उपांत्यपूर्व फेरीत
एटीपी वर्ल्डटूरमध्ये दुहेरीत स्वत:ला स्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेला लिएंडर पेस आणि पूरव राजा यांनी आज फॅबियो फोगनिनी आणि जेम्स सेरेटानी जोडीवर सरळ मात करीत सेंट पीटर्सबर्ग ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय जोडीने एक तास आणि सात मिनिटांत इटली आणि अमेरिकेच्या जोडीला ६-३, ६-४ असे नमवले. पेस आणि राजा यांनी १० पैकी ४ ब्रेक पॉइंटचे गुणांत रूपांतर केले, तर पाचपैकी तीन ब्रेक पॉइंट वाचवले.
अंतिम आठमध्ये पेस आणि राजा यांचा सामना मार्कस डॅनियल आणि मार्सेलो देमोलिनर या चौथ्या मानांकित जोडीशी होईल. डॅनियल व मार्सेलो जोडीने आॅस्ट्रियाच्या ज्युलियन नोवल आणि अॅलेक्झांडर पेया जोडीवर ३-६, ६-४, १०-६ असा विजय मिळवला.