नवव्यांदा विम्बल्डन जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा असणारा रॉजर फेडरर जेव्हा आज, रविवारी नोव्हाक जोकोविचविरुद्ध खेळेल तेव्हा त्याचा निश्चय हा सध्या सर्वात वयस्कर ग्रँडस्लॅम चॅम्पियन बनण्याचा असेल. ३७ वर्षीय फेडररने आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. दुसरीकडे चार वेळेसचा विम्बल्डन चॅम्पियन सर्बियाचा जोकोविचचा गेल्या १३ वर्षांत फेडररविरुद्ध कारकिर्दीचा रेकॉर्ड २५-२२ असा आहे. जोकोविचने फेडररविरुद्ध गेल्या २० सामन्यांपैकी १४ लढती जिंकल्या आहेत. फेडरर ग्रँडस्लॅममध्ये त्याच्याविरुद्ध चार लढती पराभूत झाला आहे. त्याने गेल्या सात वर्षांत जोकोविचला ग्रँडस्लॅममध्ये पराभूत केलेले नाही. याआधी फेडररने २०१२ मध्ये जोकोविचविरुद्ध विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये विजय मिळविला होता. पुढील महिन्यात ३८ वर्षांचा होणाऱ्या फेडररचा प्रयत्न हा केन रोसवाल याला मागे टाकण्याचा असणार आहे. १९७२ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन जिंकून केन रोसवाल हा ओपन युगात सर्वात वयस्कर चॅम्पियन बनला होता.
रॉजर फेडरर इतिहास रचणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:19 AM